‘नववीत असताना मी अन्वय नाईकांच्या प्रेमात पडले; आज करवा चौथला त्याचं फळ मिळालं’

मुंबई | रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना बुधवारी सकाळी रायगडपोलिसांनी अटक केली. २०१८ मध्ये इंटिरियर डिझानयर अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी अक्षता नाईक आणि आज्ञा नाईक या मायलेकींनी पत्रकार परिषद घेतली.

‘अर्णब गोस्वामी यांची अटक योग्य आहे. त्यांनी सुसाईड नोटमध्ये अर्णब गोस्वामी यांच्यासह नावं लिहिली आहेत. आजच्या दिवसासाठी आम्ही महाराष्ट्र सरकारचे आभार मानतो. महाराष्ट्र पोलिसांनी यापुढे निपक्ष तपास करावा. आम्हाला राजकारण करायचं नाही, फक्त न्याय हवा आहे, असे नाईक यांच्या कुटुंबियांनी म्हंटले आहे.

तसेच पुढे बोलताना अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक म्हणाल्या, ‘फक्त अर्णब गोस्वामीमुळे अन्वय नाईक यांना पैसे मिळाले नाहीत. ते जर मिळाले असते, तर माझा नवरा आज जिवंत असता. अर्णब गोस्वामी हा व्हायरस आहे,’अशी टीका अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी केली आहे.

दरम्यान, ‘नववीत असताना मी अन्वय नाईक यांच्या प्रेमात पडले, आज करवाचौथला त्याचं फळ मिळालं, अशा भावना नाईक यांची पत्नी अक्षता नाईक यांनी व्यक्त केल्या आहे. ‘अर्णब गोस्वामी सातत्याने माझ्या वडिलांना धमकी देत होते, तुला पैसे कसे मिळतात तेच पाहतो. तुझ्या मुलीचं करिअर उद्ध्वस्त करतो, अशी धमकी दिल्याची माहिती मुलगी आज्ञा नाईक यांनी दिली.

‘सुशांत सिंह प्रकरणात अर्णब गोस्वामी यांनी आवाज उठवला. त्या प्रकरणात तर कोणतीही सुसाईड नोट नव्हती. परंतु माझ्या बाबांच्या सुसाईड नोटमध्ये नाव असूनही कोणतीही कारवाई झाली नाही,’असे मुलीने सांगितले. फक्त अर्णब गोस्वामी यांच्यामुळे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला, असा आरोपही त्यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या
‘अर्णब गोस्वामींना झालेली अटक ही लोकशाहीला काळिमा फासणारी घटना’
अर्णबला भेटायला गेलेल्या भाजप नेते किरीट सोमय्यांना पोलिसांनी उचलून फेकून दिले
“अर्णब यांच्या तोंडातून काही नावे बाहेर पडतील अशी भाजपला भिती”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.