‘’आमदारकीची हळद लावून बसलोय, पण तो बाबा लग्न लावून द्यायला तयार नाही’’

महाविकास आघाडी सरकारने विधानपरिषदेवर नियुक्तीसाठी राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या नावांची यादी राज्यपालांना सोपवली आहे. पण राज्यपालांकडून या यादीला अजून मंजूरी मिळालेली नाही. त्यामुळे इच्छुक उमेदवार नाराज झाले आहेत. अनेक उमेदवारांनी नाराजी बोलून दाखवली आहे.

राज्यपाल नियुक्त आमदारपदासाठी इच्छुक असलेले गायक आनंद शिंदे यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. एका कार्यक्रमात त्यांनी नाराजी बोलून दाखवली. ते म्हणाले की, जोपर्यंत गाणी गात होतो, तोपर्यंत लय चांगलं होतं. पण जेव्हा आमदारकीसाठी गेलो तेव्हा गाणही बंद झालं अन् सगळंच बंद झालं.

एवढी मजा कोणीच केली नसेल पण आमदारकीची स्वप्नं पाहिली आणि गोंधळ झाला, असं म्हणत आनंद शिंदेंनी नाराजगी व्यक्त केली. दरम्यान, आनंद शिंदे यांच्या नावाची शिफारस राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आनंद शिंदे पुढे म्हणाले की, आता हळद लावून बसलोय पण तो बाबा लग्न लावून द्यायला तयार नाही.

त्यांनी थेट राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे नाव न घेता टोला लगावला आहे. काही दिवसांपुर्वी आनंद शिंदे म्हणाले होते की, राज्यपाल संविधानाचा विचार नक्की करतील. राज्यपाल पण चांगलेच आहेत. त्यांनी पण संविधान वाचलेले असेल. संविधानात तरतूद आहे त्यामुळे राज्यपाल सुरक्षित आहेत.

अन्यथा आमच्यावर समाजाचा दबाव आला असता. विधानपरिषदेच्या १२ जागांवर राज्यपाल नामनियुक्त सदस्यांचा प्रश्न सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. विधान परिषदेच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आनंद शिंदेच्या नावाची शिफारस करण्यात आल्याची चर्चा आहे.

विधान परिषदेतील ८ आमदार येत्या १ जानेवारीला निवृत्त होणार आहेत. त्याच्याआधीच महाविकास आघाडीकडून राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदारांची बारा नावांची यादी देण्यात आली आहे. त्याबाबत राज्यपालांनी अजून कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

महत्वाच्या बातम्या
मोदींचा मास्टरस्ट्रोक: एका झटक्यात विरोधकांचे डावपेच केले नष्ट, निवडणुकीत होणार ‘हा’ फायदा
‘सुर्यवंशी’ चित्रपटावर भडकली दाऊद इब्राहिमची गर्लफ्रेंड, म्हणाली, चांगल दाखवता येत नसेल तर..
‘हा’ राजकीय पक्ष थेट टाटांनाच नडला, कंपनीच्या गेटवर आंदोलन करत दिली ‘ही’ धमकी
न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माने मोहम्मद सिराजला मारली चापट, व्हायरल झाला व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.