कचरावेचक दोन भावांच्या टॅलेंटवर फिदा झालेले आनंद महींद्रा त्यांच्यासाठी शोधताहेत शिक्षक

मुंबई : प्रत्येक व्यक्तीमध्ये कोणती ना कोणती कला दडलेली असतेच. अलीकडे सोशल मीडियाच्या प्रभावामुळे सध्या समाजातील उपेक्षित घटकांतील कलाही आता बहरास येताना दिसत आहे. वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

असाच एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. उद्योगपती आणि महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी दिल्लीतल्या दोन भावांचे व्हिडीओ शेअर केले आहेत. तसेच याशिवाय या दोघांना मदत करण्यासाठी लोकांनी संगीत शिक्षकाची माहिती द्यावी, असे आवाहन महिंद्रा यांनी केले आहे.

महिंद्रा यांनी व्टिटमध्ये म्हंटले आहे की, अतुल्य भारत. माझा मित्र रोहित खट्टरनं ही पोस्ट शेअर केली आहे. त्यांना ती सोशल मीडियावर मिळाली होती. दोन भाऊ आहेत. त्यांचे नाव हफिज आणि हबीबूर. ते दिल्लीतील एका कॉलोनीमध्ये कचरा गोळा करतात. मात्र त्यांची गाण्याची जी कला आहे त्याला तोड नाही. प्रतिभा कधी व कुठे कशी जन्म घेईल हे काही सांगता येत नाही.’

दरम्यान, महिंद्रा यांनी पुढे ट्विटमध्ये म्हंटले आहे की, ‘या दोघांमध्ये कमालीची प्रतिभा आहे. या दोघांना संगीताचं शिक्षण मिळावं यासाठी मदत करण्याचा निश्चय मी आणि रोहितनं केला आहे. दोन्ही भाऊ दिवसभर कामात असतात. त्यामुळे त्यांना संध्याकाळी संगीत शिकवू शकेल, असा शिक्षक मिळू शकेल का?, असे त्यांनी विचारले आहे.

महत्त्वाच्या बातम्या
मुंबईत बड्या राजकारणी, अधिकाऱ्यांना पूजा शर्माचा व्हिडीओ कॉल; मुंबईत सेक्सटॉर्शनचा पर्दाफाश !
केक आणि बरंच काही! पूजा चव्हाण-संजय राठोडांच्या नव्या फोटोंनी राजकीय वर्तुळात उडाली खळबळ
मिताली मयेकरच्या ‘मंगळसूत्रा’ची सर्वत्र चर्चा; पहा तुफान व्हायरल झालेले खास फोटो

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.