बंद पडली होती कार, पठ्यानं अस देशी जुगाड केलं की आनंद महिंद्राही झाले फिदा; पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर अनेक फोटो, व्हिडीओ रोजच व्हायरल होत असतात. व्हायरल झालेल्या व्हिडीओवर नेटकरी चर्चा करतात. असाच एक व्हिडीओ प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ एका कारचा आहे. या कारमध्ये बिघाड झाल्यानंतर एका पठ्यानं देशी जुगाड वापरून कार चालू केली आहे. हा व्हिडीओ पाहून आनंद महिंद्रांनी जुगाड करणाऱ्याचे कौतुक केले आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओतील कारच्या चालकाने आणि त्याच्या सोबतच्या एका व्यक्तीने हा देशी जुगाड केला आहे. हे पाहून नेटकरी चकीत झाले आहेत. यामध्ये कारच्या इंजिनला दोरी जोडून कशी काय कार चालवली जाऊ शकते? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल.

कॅप्शनमध्ये आनंद महिंद्रा लिहितात, ‘’हा व्हिडीओ जुना वाटतो पण खूप इंटरेस्टिंग आहे’’. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून जुगाड करणाऱ्यांच कौतुक वाटेल. यावेळी आपल्याला म्हणावे लागेल की, देशी लोकांचा सामना जुगाडाच्या बाबतीत कोणी करु शकत नाही.

व्हिडीओतील कारचा बिघाड हा एक्सीलेटर वायर किंवा एक्सीलेटरमध्ये झाला असावा. यावर त्या चालकाने तो बिघाडन दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु शेवटी त्याने दोरीच्या मदतीने जे जुगाड केले ते तुम्हाला व्हिडीओत पाहाता येईल. ज्यामुळे व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. हा व्हिडीओ कोणत्या भागातील आहे याची माहिती अद्याप उपलब्ध झाली नाही.

महत्वाच्या बातम्या-
सचिन तेंडुलकर, विराट कोहली मोदी सरकारच्या समर्थनार्थ मैदानात
रतन टाटा आहेत ‘या’ गाड्यांचे शौकीन, बघा त्यांचे कार कलेक्शन
कंगना पुन्हा बरळली; भारतीय क्रिकेटर्संना म्हणाली धोबी का कुत्ता
दुबईमध्ये मिळते जगातील सर्वात महाग रॉयल गोल्ड बिर्याणी, किंमत वाचूनच पोट भरून जाईल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.