महिलांच्या कार्याला अनोखा सलाम, आनंद महिंद्रांनी शेअर केला खास व्हिडीओ

मुंबई | ८ मार्च हा दिवस जगभरात जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त महिंद्रा ऍण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी महिंद्रा ट्रॅक्टरची एक खास जाहिरात शेअर केली आहे. जाहिरातीचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

जाहिरातीत दाखवण्यात आलेल्या स्टोरीचं सोशल मीडियावर विशेष कौतुक होत आहे. या व्हिडीओत महिला पुरुषांपेक्षा कमी नसल्याचे दाखवण्यात आले आहे. महिलांसाठी ट्रॅक्टर चालवणं सोप नाही आणि ही टेस्ट अवघड असल्याचे तेथील अधिकारी सांगतात. परंतु महिंद्रा ट्रॅक्टरच्या या जाहिरातीमध्ये महिलेच्या आत्मविश्वासामुळे ती कशी जिंकते हे दाखवण्यात आले आहे.

जाहिरातीचा हा व्हिडीओ हिंदी भाषेत बनवण्यात आला आहे. जाहिरातीची थीम “सोपं असतं तर प्रत्येकजण शेतकरी असता” अशी ठेवण्यात आली आहे. जाहिरातीमध्ये शक्ती नावाची महिला ट्रॅक्टरची ड्रायव्हिंग टेस्ट देण्यासाठी येते त्यावेळीची घटना दाखवण्यात आली आहे.

जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या प्रति असणारा दृष्टिकोन बदलणं आणि शेतकऱ्यांना सलाम करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर करताना आनंद महिंद्रा यांनी ‘केवळ एकच शब्द: शक्ती’ असे कॅप्शन दिले आहे.

महत्वाच्या बातम्या-
VIDEO: पठ्ठ्याने टॅम्पोवर उभारला बंगला, हा खतरनाक जुगाड पाहून आनंद महिंद्रा म्हणाले….
बॉलीवूड अभिनेत्री मयूरी कांगो आज आहे भारतातील गुगल इंडस्ट्रीची हेड; वाचा तिचा थक्क करणारा प्रवास
प्रेरणादायी! ४६ वर्षीय अम्मा युट्यूबवरून कमावतात लाखो रूपये, वाचा कसे…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.