तिनं आयुष्यावर प्रेम करायला शिकवलं, तिचा मृत्यू व्यर्थ जाणार नाही; आनंद महिंद्राही झाले भावूक

मुंबई | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात थैमान घातले आहे. कोरोनाची वाढती रूग्णसंख्या आणि लॉकडाऊन यामुळे अनेकांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. अशात ३० वर्षीय तरुणीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.

व्हिडिओमध्ये तरुणी ‘लव्ह यु जिंदगी’ हे गाणे ऐकत त्यावर डान्स करताना दिसून आली होती. विशेष बाब म्हणजे तिला कोरोना झालेला होता आणि तिच्या नाकाला ऑक्सिजन मास्क पण लावलेला दिसतो. अनेकांनी त्या मुलीच्या साकारात्मकतेला दाद दिली होती. मात्र यानंतर या तरुणीचा मृत्यू झाल्याची बातमी पुढे आली आहे. दिल्लीतील एका रुग्णालयात तिने शेवटचा श्वास घेतला.

दरम्यान, आता महिंद्रा अँड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं सर्वांना हादरून सोडलं आहे. पण या संकटातही जगायचं कसं, हे आपल्याला या तरुणीने शिकवलं.

आनंद महिंद्रा म्हणतात, कोरोनाविरुद्धचा लढा तिनं गमावला असला तरी आयुष्यावर प्रेम करण्याचा मोलाचा सल्ला ती देऊन गेली. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी या तरुणीच्या जाण्याचा शोक व्यक्त केला आहेत. तिचा मृत्यू व्यर्थ जाणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

आयुष्यावर प्रेम करायला शिकवणाऱ्या तरुणीचा मृत्यू झाल्यामुळे सोशल मीडियावर सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. मागच्या आठवड्यात ट्विटरवरून या तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता.

डॉ. मोनिका लंगेह यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून या मुलीचा व्हिडीओ टाकला होता. त्यांच्या मतानुसार या तरुणीला आयसीयूत जागा न मिळाल्यामुळे कोविड इमर्जन्सी विभागात ठेवण्यात आले होते. तिच्यावर प्लाझ्मा थेरपी आणि रेमडेसिवीर इंजेक्शचे पण उपचार केले गेले होते.

महत्वाच्या बातम्या-
गंगेत वाहून आलेल्या मृतदेहांमागील खरी कारणं आली समोर; कारणं वाचून तुम्हाला बसेल धक्का
लॉकडाऊनमुळे घरकाम करणाऱ्या महिलेच्या परिस्थितीची कहाणी ऐकून पोलिसांचे डोळेही पाणावले, म्हणली…
भाजून बटाटा खाल्ल्याने होतात ‘हे’ फायदे; वाचा सविस्तर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.