महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. त्यांच्या अनोख्या पोस्टमुळे नेहमी ते लोकांचे मनोरंजन करत असतात. त्यामुळे ट्विटरवर त्यांचा एक वेगळा चाहतावर्ग आहे.
आपल्या अनोख्या ट्विट्समुळे आणि हजरजबाबी वृत्तीमुळे आनंद महिंद्रा सोशल मिडियावर नेहमी चर्चेत असतात. पण यावेळेस नेमके उलटे झाले आणि आनंद महिंद्रांची बोलती बंद झाली.
याचे कारण असे होते की, आनंद महिंद्रांनी एक फोटो ट्विटरला शेअर केला. हा फोटो मास्कचा होता. यामध्ये गुलाबी आणि पिवळे मास्क आहेत आणि एकावर लडकेवाले व एकावर लडकीवाले असं लिहिलेले आहे. आनंद महिंद्रा म्हणाले खरंच या मास्कने माझी बोलती बंद केली आहे.
या मास्कवरून आपण अंदाज लावू शकतो की कशा प्रकारे लग्न सोहळ्यात मास्क डिझाईन केले जातात. वधू आणि वर पक्षाची मंडळी हे मास्क घालणार आहेत. कोरोनाच्या काळात लग्न सोहळे पार पडत आहेत.
पण त्यातही लोक योग्य काळजी घेऊन लग्न सोहळे पार पाडत आहेत. आनंद महिंद्रा यांच्या या ट्विटवर अनेक मजेशीर रिप्लाय आले आहेत. एकाने तर कंमेंट केली आहे की, लग्नामध्ये सॅनिटायजरसुद्धा वाटले जात आहेत. आनंद महिंद्रा यांचे हे ट्विट सध्या खूप व्हायरल होत आहे.
I don’t know whether to be amused or horrified. Sach mein, ye masks ne meri bolti band kar di… pic.twitter.com/f0KqztJYVI
— anand mahindra (@anandmahindra) November 28, 2020