उद्योगपतींसोबत घेतलेल्या बैठकीनंतर आनंद महिंद्रांनी उद्धव ठाकरेंच्या ‘या’ गोष्टीचं केलं कौतूक; म्हणाले…

मुंबई | कोरोनामुळे राज्यातील परिस्थिती भीषण होत चालली आहे. सरकार कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर निर्णय घेत आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोरोना रुग्ण दिवसेंदिव वाढत चालले असल्याने लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे.

राज्यात लस, बेड,ऑक्सिजन यांचा तुटवडा जाणवू लागला आहे. राज्यावर आलेलं संकटामध्ये अनेकांनी पुढे येऊन मदत करावी असं आवाहन करण्यात येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे नेहमी लाईव्ह जनतेशी संवाद साधत असतात.

दोन दिवसांपुर्वी मुख्यमंत्र्यांनी उद्योगपतींसोबत राज्यातील कोरोनाच्या परिस्थीतीवर बैठक घेतली होती. यामध्ये मुख्यमंत्र्यांनी अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा केली. मुख्यमंत्र्यांच्या या बैठकीचे उद्योजक आनंद महिंद्रा यांनी कौतुक केलं आहे.

ट्विट करत आनंद महिंद्रा म्हणाले, “ज्या पध्दतीने बैठक झाली. त्यावरून आमची बैठक उपयुक्त झाली असं वाटतयं. बैठकीत औपचारिक किंवा शिष्टाचारी वक्त्वव्यांमध्ये वेळ वाया घालवण्यात आला नाही. बैठकीत अजेंडा केंद्रस्थानी होता”.

“कोरोना परिस्थितीचं वास्तव लक्षात घेऊन सरकार व कॉर्पोरेटद्वारे करण्यात येत असलेल्या प्रयत्नांवर जोर दिला गेला. याशिवाय पुर्ण मोहिमेच्या पाठपुरावा व समन्वयासाठी व्यस्था निर्माण करण्यावर भर देण्यात आला”.

मुख्यमंत्र्यांनी बैठकीत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा राज्यातील जनतेला आणि उद्योगधंद्यांना फटका बसू नये. यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना, कोरोनामुळे राज्यातील झालेली परिस्थिती यांवर  चर्चा केली होती.

यामुळे उद्योजक आनंद महिंद्रा यांनी मुख्यमंत्र्यांनी वेळ वाया न घालवता मुख्य आणि नेमक्या मुद्यांवर सल्लामसलत केली असल्याचं महिंद्रांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या या बैठकीचं मनापासून कौतूक केले आहे.

दरम्यान उद्योजक आनंद महिंद्रा देशात घडत असलेल्या गोष्टींवर मत मांडत असतात. त्यामध्ये ते चांगलं काम करणाऱ्यांच कौतूकही करतात. काही दिवसांपुर्वी त्यांनी कोरोना काळात जीव तोडून काम करण्याऱ्या कोरोना योध्द्यांच शायरीच्या माध्यमातून कौतूक केलं होतं.

महत्वाच्या बातम्या-
‘हे’ मुस्लिम कलाकार हिंदू नाव लाऊन बाॅलीवूडमध्ये झाले प्रसिद्ध; नावे वाचून बसेल धक्का
…तेव्हापासून ही म्हण प्रचलित झाली की, “हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून आला”
रुग्णालयातच परीक्षेची तयारी करतोय कोरोना रूग्ण, त्याच्या जिद्दीचे कलेक्टरनेही केले कौतूक; म्हणाले..

 


Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.