आनंद महींद्रा राबवणार ऑक्सीजन ऑन व्हिल्सची भन्नाट मोहीम; घराघरात पोहोचवणार ऑक्सीजन

मुंबई | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे ऑक्सिजन, लस, बेड यांचा मोठा तुटवडा जाणवू लागला  आहे. रुग्णांचा धक्कादायक अवस्थेत मृत्यू होत आहे.

देशावर आलेल्या संकटात अनेक खेळाडू, उद्योजक, अभिनेते, नेते मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. ऑक्सिजनचा मोठा तुटवडा जाणवू लागला असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑक्सिजन एक्सप्रेस सुरू केली आहे.

अशातच प्रसिध्द उद्योजक आनंद महिंद्रा यांनीही मदतीसाठी खारीचा वाटा उचलला आहे. ऑक्सिजनच्या वाहतूकीसाठी आनंद महिंद्रांनी  महिंद्रा बोलेरो पिकअप रस्त्यावर उतरवले आहेत. ट्विट करत त्यांनी ही माहिती दिली आहे.

आनंद महिंद्रा म्हणाले, देशात ऑक्सिजनच्या वाहतूकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. यामूळे ऑक्सिजन ऑन व्हिल्सच्या माध्यमातून महिंद्रा लॉजिस्टीक ऑक्सिजन निर्मिती प्लांट ते रुग्णालय आणि कोरोना रुग्णांच्या घरोघरी ऑक्सिजन पुरवणारआहे.

पुढे म्हणाले, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना वचन दिले होते की, ४८ तासाच्या आत पुणे आणि चाकणमधून २० महिंद्रा बोलेरोमधून ऑक्सिजनची वाहतूक करण्यास सुरूवात होईल. त्यानंतर २० वाहनांनी १३ रुग्णालयात ६१ ऑक्सिजन सिलेंडर पोहोचवले आहेत.

येत्या ४८ तासात ७० ते ७५ वाहनं मुंबई, नाशिक,ठाणे, नागपुर या शहरात ऑक्सिजन वाहतूक करण्यास सुरूवात करतील.  सध्या तरी महाराष्ट्रात ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. त्यानंतर संपुर्ण देशभरामध्ये स्थानिक डिलरशीपच्या माध्यमातून ऑक्सिजन पुरवठा करणार आहोत.

देशात कोरोना रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. गेल्या २४ तासात देशात ३ लाख ९२ हजार ४८८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर २४ तासात ३,६८९ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
महत्वाच्या बातम्या-
“सोनिया गांधी मोदींना मौत का सौदागर म्हटल्या ते बरोबर होतं; त्यांना पुढे काय होणार दिसलं होतं”
पंढरपुरमध्ये भाजपने केला राष्ट्रवादीचा करेक्ट कार्यक्रम; भाजपचे समाधान अवताडे विजयी
गड आला पण सिंह गेला; नंदीग्राममधून ममता बॅनर्जी पराभूत
सोनू सूदने टेकले आरोग्य व्यवस्थेपुढे गुडघे;रुग्णाला बेड मिळवून देण्यासाठी त्यालाही बघावी लागली वाट

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.