जीवाची परवा न करता कर्मचाऱ्याने सुरू केला मुंबईचा वीजपुरवठा, आनंद महिंद्रांनीही केले कौतुक

मुंबई | सोमवारी मुंबईचा वीजपुरवठा खंडीत झाला होता. ग्रीड फेल झाल्यामुळे वीज गेली होती. त्यानंतर मुंबईकर त्रस्त झाले होते. सोशल मिडीयावर #powercut हा ट्रेंड सुरू झाला होता. तसे बघायचे झाले तर मुंबईला २४ तास वीजपुरवठा सुरळीत चालू असतो.

काही तांत्रिक अडचणी आल्यास वीजपुरवठा खंडीत होतो. पण आपण लगेच प्रशासनाला नावे ठेवण्यास सुरूवात करतो. एकीकडे वीजपुरवठा करणारे कर्मचारी २४ तास काम करत असतात. असाच एक व्हिडीओ महाराष्ट्र परिचय केंद्र, दिल्ली येथील उपसंचालक द्यानंद कांबळे यांनी ट्वीटरवर शेअर केला आहे.

हा व्हीडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की, कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून काम करत असतात. हा व्हिडीओ आनंद महिंद्रा यांनी रिट्वीट केला आहे. यावर त्यांनी आपली प्रतिक्रीया मांडली आहे. ते म्हणाले आहेत की, लाईट गेल्यानंतर तक्रार करण्याआगोदर मी आधी या कर्मचारी वर्गाबाबत विचार करेन.

उपसंचालक दयानंद कांबळे यांनी लिहीले होते की, सोमवारी लाईट जाण्याचे कारण खंडाळा घाटातील विजेच्या तारांमध्ये समस्या होती. एक मोठा ब्रेकडाऊन झाल्यामुळे सगळ्या लाईट्स गेल्या होत्या. MSEB चे कर्मचारी सुमारे चार तासापासुन जास्त वेळ त्याचे काम करत होते. त्यांच्या धाडसाला सलाम.

व्हिडीओला आतापर्यंत ५६ हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिले असून तब्बल चार हजार लोकांनी या ट्विटला रिट्वीट केले आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनीही हा व्हिडीओ ट्वीटरवर शेअर केला आहे.

त्यांनी लिहिले आहे की, मुंबईला अखंडीत वीज पुरवठा करणाऱ्या चार मुख्य वाहिण्यापैकी एक असलेल्या कळवा-तळेगाव या वीज वाहीनीचा तुटलेला कंडक्टर दुरूस्त करण्यासाठी महापारेषण च्या कर्मचाऱ्यांनी लोणावळ्याच्या दुर्गम व अतिखोल भागात वादळ आणि वाऱ्यात जीवावर उदार होऊन काम पूर्ण केले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.