मुंबईकरांच्या ‘त्या’ भावनिक क्षणामुळे आनंद महिंद्राही झाले भावूक, प्रार्थना करत म्हणाले..

मुंबई | कोरोना महामारीमुळे सर्वसामान्य मुंबईकरांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली नव्हती. दरम्यान आता १ फेब्रुवारीपासून राज्य सरकारने सर्वांनाच प्रवासाची मुभा दिली आहे. अशात कोरोनानंतर पहिल्यांदाच लोकलचा प्रवास करण्यासाठी आलेले मुंबईकर भावूक दिसत होते. या क्षणाचे फोटो व्हायरल झाले आहेत. यामधील युवक लोकलच्या दारावर माथा टेकवताना दिसत आहे. हा फोटो ट्विट करत प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही भावनिक पोस्ट केली आहे.

मुंबई लोकलची ओळख मुंबईची लाईफलाईन अशी आहे. मुंबई लोकलसोबत मुंबईकरांच एक वेगळच भावनिक नातं आहे. ते नातं इतक घट्ट आहे की, सर्वसामान्य मुंबईकरांसाठी लोकल सेवा १ फेब्रुवारीला सुरु झाली. यानंतर पहिल्या प्रवासाच्या आणि लोकल ट्रेनसोबतच्या त्या पहिल्या भेटीत प्रवाशांच हे भवनिक नातं दिसून आले.

लोकलच्या दारावर माथा टेकवून ट्रेनला वंदन करतानाचा फोटोवर प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी शेअर केला आहे. ट्विटरवर फोटो शेअर करत आनंद महिंद्रा यांनी ‘’हा भारताचा आत्मा आहे. मी प्रार्थना करतो की आपल्यापासून ही गोष्ट कधीही दुरावणार नाही’’ असं कॅप्शन  देत आनंद महिंद्रा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

लोकलसमोर नतमस्तक झालेले प्रवाशी सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यांच्या फोटोवर येणाऱ्या कमेंट हृदयस्पर्शी आहेत. तसेच सोशल मीडियावर वेगवेगळे कॅप्शन देत फोटो पोस्ट केले जात आहेत.

मुंबई लोकलच्या प्रवाशांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये ‘ज्या गोष्टीमुळे पोटाची भूक मिटते, त्या गोष्टीला वदंन करताना एक सामान्य मुंबईकर’, ‘हिचा म्हणजे लोकल अन् लोकलसेवेची जाण आणि आयुष्यावर होत आलेले उपकार कसे तर ते पाय ठेवण्यापूर्वी हृदयस्पर्शी चरणस्पर्श…”ही” नव्हती तर जवळजवळ आयुष्य उध्वस्त होण्याची वेळ आली होती…उशीराने का होईना नवीन उमेद अपेक्षा ठेवून जीवन जगण्याचा मार्ग सुरू झाला…’, लोकल यापुढे अशीच अखंड चालू राहू दे हीच प्रार्थना. अशा प्रतिक्रिया मुंबईकर व्यक्त करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-
हृदयस्पर्शी चरणस्पर्श..! ‘लाईफलाईन’ रुळावर आल्यानंतर वंदन करताना सामान्य मुंबईकर, पाहा फोटो
जेव्हा राज ठाकरेंनी निलेश साबळेला १०-१२ वेळा फोन केला, तरी फोन नाही उचलला अन् जेव्हा फोन उचलला तेव्हा…
अनुराग कश्यपच्या मुलीचे बिकिनीमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल, फोटो पाहून घायाळ व्हाल
मुंबई मनपाचे सहआयुक्त पाणी समजून सॅनिटायझर प्यायले; अन् पुढे…
पहिली मिस इंडिया झालेली इंद्राणीने भारताची संस्कृती जपण्यासाठी बिकिनीवर लावली होती टिकली

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.