ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयावर आनंद महिंद्रांकडून ‘या’ सहा खेळाडूंना मिळणार कार गिफ्ट

मुंबई | उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या विजयाचे नायक ठरलेल्या सहा युवा खेळाडूंना एसयूव्ही कार देण्याचे जाहीर केले आहे. त्यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली. महिंद्रांच्या या निर्णयामुळे युवा खेळाडूंनी केलेल्या कामगिरीबद्दल कौतुकाची थाप मिळाली आहे.

आनंद महिंद्रा हे देशातील एक मोठे उद्योगपती आहेत. उद्योगांसोबत त्यांना मोठा दिलदार मनाचा व्यक्ती म्हणून वेगळी ओळख आहे. त्यांच्या मनाचा मोठेपणा अनेक वेळा समोर आला आहे. त्यांनी नेहमी काहीतरी वेगळेपणा सिद्ध करणाऱ्यांना मोठ-मोठी बक्षिसे दिली आहेत. आता त्यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी जाहीर केले आहे की, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या विजयाचे नायक ठरलेल्या सहा युवा खेळाडूंना ते एसयूव्ही कार भेट म्हणून देणार आहेत.

महिंद्रा यांनी खेळाडूंना एसयूव्ही थार देण्याचे ठरवले आहे. ज्या सहा खेळाडूंनी कार दिली जाणार आहे त्यामध्ये मोहम्मद सिराज, टी नटराजन, शार्दुल ठाकुर, वॉशिंग्टन सुंदर, शुभमन गिल, और नवदीप सैनी या खेळाडूंचा समावेश आहे. या खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरात लोळवले आहे. या युवा खेळाडूंनी विजयात मोलाचा वाटा उचलला आहे.

भारतीय क्रिकेट संघाच्या या ऐतिहासिक विजयानंर बीसीसीआयने संघाला ५ कोटी रुपयांचा बोनस देण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर आता उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी खेळाडूंना बक्षिस जाहीर केले आहे. या सर्व सहा खेळाडूंची ऑस्ट्रोलियातील कामगिरी कौतुकास्पद आहे.

महत्वाच्या बातम्या-
बेहती गंगा में हात धोना! आता आनंद महिंद्रांनीही लावला क्लार्क, पॉंटिंग, वॉला टोला; म्हणाले..
कन्यारत्न प्राप्तीनंतर अशी झाली अनुष्काची अवस्था; पहा व्हिडिओ
ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरात लोळवल्यानंतर ड्रेसिंग रूममधून समोर आला पहिला व्हिडीओ
ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरात चारीमुंड्या चीत करत भारताने कसोटी मालिका जिंकली

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.