पोलिसांनी लोकांना दिलेली शिक्षा बघून आनंद महिंद्राही घाबरले; व्हिडीओ शेअर करत म्हणाले…

 

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनावरची जबाबदारी वाढत चालली आहे, त्यामुळे नियमांचे पालन न करणाऱ्यांना पोलीसांकडून शिक्षा केली जात आहे.

आता मुंबई पोलिसांची शिक्षा बघून  प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रासुद्धा घाबरल्याचे दिसून आले आहे, तसेच ही शिक्षा पाहून मी कधीही मास्क विसरणार नाही, असेही त्यांनी ट्विट करत म्हटले आहे.

आनंद महिंद्रा नेहमीच सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात, तसेच बऱ्याचवेळा सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओ पोस्ट करत असतात, आता असाच एक व्हिडिओ आनंद महिंद्रा यांनी पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये काही मुलांनी मास्क न घातल्यामुळे पोलीस त्यांना शिक्षा करत आहे.

हा व्हिडीओ पोट करत आनंद महिंद्रा म्हणाले, मुंबई पोलिसांनी दिलेली ही शिक्षा बघून मी तरी मास्क विसरणार नाही. ही शिक्षा बघून मला माझ्या बोर्डिंग शाळेची आठवण झाली, तेव्हा ही शिक्षा सामान्य होती, पण आता ही शिक्षा बघून मी कधीच मास्क विसरणार नाही, असे आनंद महिंद्रा यांनी म्हटले आहे.

दरम्यान, व्हिडीओमध्ये पोलिसांनी काही मुलांना कोंबडा बनवले आहे. हा व्हिडीओ मुंबईतील मरिन ड्राइव्ह इथल्या नियम मोडणाऱ्या लोकांचा आहे. प्रशासनाने नियमांचे पालन करण्यास सांगितले असले तरी काही नागरिक बेजबाबदारपणे फिरताना दिसून येत आहे.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.