Share

‘या’ कारला उडवण्यासाठी तुम्हाला अनुबॉम्बची गरज भासेल, आनंद महिंद्रांचे थेट रोहित शेट्टीला आव्हान

प्रसिद्ध उद्योगपती आणि महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा नेहमीच त्यांच्या ट्विटमुळे चर्चेत असतात. सध्या सोशल मीडियावर एक मीम व्हायरल होतं आहे. या मीमच्या माध्यमातून महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा(Anand Mahindra) यांनी ‘सिम्बा’ चित्रपटाचे दिग्दर्शक रोहित शेट्टीला थेट चॅलेंज देण्यात आले आहे.(anand mahindra challenge to director rohit shetty)

सध्या या मीमची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होतं आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टी त्यांच्या चित्रपटांमध्ये कार उडविण्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या चित्रपटांमध्ये अनेक ऍक्शन दृश्ये असतात. या ऍक्शन दृश्यांमध्ये अनेकवेळा कार उडविल्या जातात. त्या बहुतेकदा महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या कार असतात.

यावरून प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर हे मीम शेअर करत दिग्दर्शक रोहित शेट्टीला थेट आव्हान दिलं आहे. प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. त्यांनी ट्विटरवर मीम शेअर करत लिहिले की, “रोहित शेट्टी तुम्हाला ही गाडी उडविण्यासाठी अणुबॉम्बची गरज भासणार आहे”, असे मजेशीर ट्विट आनंद महिंद्रा यांनी केलं आहे.

https://twitter.com/anandmahindra/status/1528018910842339330?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1528018910842339330%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fpudhari.news%2Fautomobile%2F197015%2Frohit-shetty-will-need-a-bomb-to-blow-up-this-car-anand-mahindra-has-challenged-the-action-director%2Far

नुकताच नवीन महिंद्रा स्कॉर्पिओ-एन कारचा टीझर लाँच करण्यात आला होता. या टीझरवरून एका युजरने मीम तयार करत ते सोशल मीडियावर शेअर केले होते. रोहित बिश्नोई नावाच्या युजरने ते मीम सोशल मीडियावर शेअर केले होते. या मीममध्ये जॉनी लिव्हरचा एक प्रसिद्ध डायलॉग असलेला फोटो देखील शेअर करण्यात आला होता.

त्या फोटोसोबत लिहिले होते की, “अभी माझा आएगा ना भिडू.” त्यावर उत्तर देताना महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा यांनी हे ट्विट केलं आहे. हे मीम सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा यांनी केलेल्या ट्विटवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.

‘स्कॉर्पिओ-एन’ ही महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीची नवीन कार २७ जूनला लाँच करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी या कारचा टीझर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला. या टीझरला बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी आवाज दिला आहे. अमिताभ बच्चन यांनी देखील ट्विट करत या नवीन कारचा टीझर शेअर केला होता.

महत्वाच्या बातम्या :-
मशीद कोणीही घेऊ शकत नाही कुर्बानी देण्यासाठी तयार, मुस्लीम खासदाराचे खळबळजनक वक्तव्य
फक्त पेट्रोल डिझेल नाही तर महागाईमध्ये मोदी सरकारने या ५ गोष्टीही केल्यात स्वस्त, घ्या जाणून..
मी खूप निराश आहे, माझ्यासोबत यापुर्वीही असे घडलेय..; रोहीत शर्माच्या वक्तव्याने खळबळ

ताज्या बातम्या इतर मनोरंजन

Join WhatsApp

Join Now