आनंद महिंद्रा झाले १०६ किलोमीटर सायकल चालवणाऱ्या बापाचे फॅन; केली ‘ही’ मोठी मदत

 

मुंबई | महिंद्रा अँड महिंद्राचे अध्यक्ष आनंद महिंद्रा हे आपल्याला सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असताना दिसतात. तसेच वेगवेगळे विचार आणि अनेक कल्पना ते आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून मांडत असतात.

अनेकदा सोशल मीडियावर अनेकांच्या समस्या व्हायरल होताना दिसतात. हे बघून आनंद महिंद्रा हे अनेकांना मदतीचा हात देत असताना दिसून आले आहे.

आत पुन्हा एकदा आनंद महिंद्रा एका माणसाच्या मदतीला धावून आले आहे. महिंद्रा यांनी मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात राहणाऱ्या एका व्यक्तीला मदत केली आहे.

लॉकडाऊनमध्ये बापाचे कर्तव्य बजावत शोभाराम यांनी आपला मुलगा आशिषला परीक्षेला घेऊन जाण्यासाठी १०६ किलोमीटर सायकली चालवली आहे. त्यामुळे आनंद महिंद्रा यांनी त्या व्यक्तीची मदत करत त्यांच्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे.

मुलाच्या भविष्यासाठी स्वप्न पाहणाऱ्या आणि त्यासाठी झटणाऱ्या बापाला सलाम. अशीच स्वप्ने देशाला पुढे घेऊन जातात. आमची संस्था आशिषच्या पुढील सर्व शिक्षणाचा खर्च उचलत आहे, असे ट्विट आनंद महिंद्रा यांनी केले आहे.

दरम्यान, आनंद महिंद्रा यांनी केलेल्या या मदतीनंतर नेटकऱ्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.