मराठमोळ्या मुलाच्या कल्पकतेला आनंद महिंद्रांची दाद; बिझनेससाठी दिली कोट्यवधींची ऑफर

जेव्हा जेव्हा क्रिएटिव टैलेंटचे कौतुक करण्याचा विचार येतो तेव्हा तेव्हा ‘आनंद महिंद्रा’ आघाडीवर असल्याचे दिसते. ते केवळ कौतुकच करत नाही तर त्या क्रिएटिव माइंडला आपला ठसा उमटवण्यास मदत करतो. यावेळी आनंद महिंद्रा यांची नजर एका भारतीय उद्योजकावर आली आहे ज्याची कंपनी प्लास्टिकच्या बाटल्या आणि कचऱ्याच्या पिशव्यांमधून स्नीकर्स (शूजचा एक प्रकार) बनवते.

हा भारतीय उद्योजक २३ वर्षांचा ‘आशय भावे’ आहे. आशय जेव्हा बिझनेस स्कूलमध्ये होता तेव्हा त्याला एक कंपनी सुरू करण्याची कल्पना सुचली जी प्लास्टिक कचऱ्याचा पुनर्वापर करून स्नीकर्स बनवेल. ‘थैली’ असे त्याच्या स्टार्टअपचे नाव आहे. दरवर्षी वापरल्या जाणाऱ्या १०० अब्ज प्लास्टिक पिशव्यांच्या समस्येवर तोडगा काढणे हा या कंपनीचा उद्देश होता.

या प्लास्टिक पिशव्या दरवर्षी १२ दशलक्ष बॅरल तेल वापरतात आणि दरवर्षी सुमारे १,००,००० सागरी प्राणी मारतात. आनंद महिंद्रा यांना आशयच्या या क्रिएटिव्हिटी बद्दल नॉर्वेचे माजी मंत्री आणि संयुक्त राष्ट्रांचे माजी पर्यावरण प्रमुख ‘एरिक सोल्हेम’ यांच्या ट्विटवरून समजले. एरिक सोल्हेम यांनी आपल्या ट्विटमध्ये बिझनेस इनसाइडर ‘थैली’ आणि आशय संबंधित व्हिडिओ शेअर केला आहे, तसेच स्टार्टअपचे कौतुक केले आहे.

आनंद महिंद्रा यांनी या स्टार्टअपची माहिती नसल्याची खंत व्यक्त केली. अशा स्टार्टअपला प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. आनंद महिंद्रा यांनी आशयच्या कंपनीने बनवलेल्या शूजची जोडी खरेदी करण्याच्या निर्णया सोबतचं त्याच्या स्टार्टअपला निधी देण्याचेही ठरवले आहे.

आशयने जुलै २०२१ मध्ये ‘थाली’ स्टार्टअप सुरू केले. शूजची एक जोडी बनवण्यासाठी १२ प्लास्टिकच्या बाटल्या आणि १० प्लास्टिक पिशव्या लागतात. शूज बनवताना प्लॅस्टिक पिशव्या उष्णता आणि दाबाच्या मदतीने थालीटेक्स नावाच्या फॅब्रिकमध्ये बदलतात. नंतर ते शूज पॅटर्नमध्ये कापले जाते.

प्लास्टिकच्या बाटल्यांना आरपीईटी (पॉलीथिलीन टेरेफ्थालेट) नाव देण्यात आले आहे. ज्याचा वापर लाइनिंग, शूलेस, पॅकेजिंग आणि इतर भागांसाठी केला जातो. बुटाचा सोल रिसायकल्ड रबरची असते. १० डॉलरच्या किमतीत कंपनी हे शूज जगात कुठेही पाठवण्यास तयार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.