लोकांचं पोट भरावं यासाठी १ रुपयाला इडली विकते, त्या अम्माला आता आनंद महिंद्रा देणार पक्के घर

 

सोशल मीडियावर अनेकदा इडली विकणाऱ्या अम्माचे फोटो, व्हिडीओ व्हायरल होत असतात, या अम्मा लोकांचं पोट भरण्यासाठी १ रुपयाला इडली विकतात. आता त्यांच्या या कामाची दखल थेट उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी घेतली आहे.

आनंद महिंद्रा आता त्या अम्माला पक्के घर मिळवून देण्यासाठी मदत करणार आहे, अशी माहिती आनंद महिंद्रा यांनी स्वतः ट्विट करून दिली आहे.

जेव्हा आनंद महिंद्रा यांना २०१९ मध्ये अम्माची माहिती मिळाली, तेव्हा महिंद्रांनी अम्माच्या या उद्योगात गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली होती, त्यानंतर महिंद्रा अम्माला मदत करत आहे.

१ रुपयाला इडली विकणाऱ्या या अम्माचे वय ८५ वर्षे आहे. त्यांचे नाव कमलाथल आहे. आता आनंद महिंद्रा अम्माला लवकरच घर मिळवून देणारा आहे, याबाबतची माहिती स्वतः आनंद महिंद्रा यांनीच दिल्याने अम्मा आता चर्चेत आल्या आहेत.

दरम्यान, आनंद महिंद्रा यांनी २०१९ मध्ये जेव्हा आनंद महिंद्रा यांनी ट्विट करून अम्माला मदत करण्याची इच्छा व्यक्त केली होती, त्यानंतर भारत गॅसने स्वतःहून अम्माला गॅसचे कनेक्शन दिले होते.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.