आनंद महिंद्रांनी शेअर केला एका आगाऊ बाळाचा व्हिडिओ; म्हणाले, हे बाळ…

प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खुप ऍक्टिव्ह असतात. ते नेहमीच वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. जेव्हा जेव्हा आनंद महिंद्रांना काही विशेष दिसते, ते पटकन आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ते शेअर करत असतात.

आता त्यांनी एका लहान मुलीचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ खुप मजेदार आहे. तसेच हा व्हिडिओ पाहून तुम्हाला हसू ही आवरणार नाही. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओमध्ये एक गोंडस लहान बाळ दिसून येत आहे. जो एका खुर्चीवर बसलेला आहे. त्याला खुप भुक लागलेली दिसून येत आहे. पण त्याच्यासमोर खाण्यापिण्याच्या वस्तु देऊनही तो नाकारत आहे.

व्हिडिओमध्ये त्या मुलाला आधी नुडल्स देतात, त्यानंतर दुधाची बाटली, पण तो लगेच त्या गोष्टींना नाकारतो. मग त्याला शांत करण्यासाठी वाईनच्या ग्लासामध्ये त्याला ड्रिंक दिले जाते आणि ते पाहून तो खुपच आनंदी होताना दिसत आहे. आधी रडत असणारा मुलगा ग्लास बघताच हसायला लागतो. एक व्हिडिओ तुमचा पुर्ण मुड बदलू शकतो, असे कॅप्शन आनंद महिंद्रा यांनी या व्हिडिओला दिले आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून आतापर्यंत २ लाखपेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे. तर १६ हजार लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. तर ४०० पेक्षा जास्त लोकांनी मजेदार कमेंट केल्या आहे.

हे लहान बाळाला आता खेळणी नकोय म्हणून तो शांत राहणार नाही, त्याला काही तरी नवीन हवे आहे. तर दुसऱ्या युजरने म्हटले आहे, की व्हिडिओ पाहिल्याने कोणाच्याही चेहऱ्यावर हसू येईल इतका हा मनोरंजक व्हिडिओ आहे.

महत्वाच्या बातम्या-

चाहत्यांनी विराट, रोहित आणि धोनीचं एका शब्दात वर्णन करायला सांगितलं; सुर्यकुमारने दिली भन्नाट उत्तरं
मलायकाचं वय, घटस्फोट आणि मुलाबाबत व्यक्त झाला अर्जुन कपूर, नात्याबद्दल खुलासा करताना म्हणाला…
रोहितची एक्स-गर्लफ्रेंड होती खुपच हॉट आणि ग्लॅमरस, कोहलीमुळे झाले होते ब्रेकअप, पाहा फोटो

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.