अवघ्या १२ व्या वर्षी संन्यासी बनलेल्या आनंद गिरीचा थाटमाट एखादा बाॅलीवूड सेलिब्रीटीला लाजवेल

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष नरेंद्र गिरी यांच्या निधनानंतर आनंद गिरी यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा होत आहे. सोमवारी, २० सप्टेंबर रोजी नरेंद्र गिरी यांचा मृतदेह प्रयागराजच्या बाघंब्री मठात फाशी घेतलेल्या अवस्थेत आढळला.

पोलिसांना घटनास्थळावरून एक सुसाईड नोटही सापडली, ज्यात आनंद गिरी यांच्या नावाचा उल्लेख आहे. आनंद गिरी महंत नरेंद्र गिरी यांचे शिष्य होते. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. गुरूला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, त्यांनी आपल्या गुरूच्या मृत्यूला षड्यंत्र म्हणत निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.

Anand Giri Cars

मंगळवार, २१ सप्टेंबर रोजी या आत्महत्येशी संबंधित नवीन माहिती माध्यमांमध्ये चर्चेचा विषय बनत आहे. दरम्यान, आनंद गिरी यांचे काही फोटो समोर आले आहेत, ज्यामुळे त्यांची लक्झरी लाइफ स्टाइल लक्षात येत आहे. आनंद गिरी दावा करतात की त्यांनी किशोरवयात संन्यासी घेतला आहे. पण इंडिया टुडे / आज तकला मिळालेल्या फोटोज वरून वाटते की आनंद गिरी अद्याप सांसारिक आसक्तीपासून मुक्त झालेले नाही.

Anand Car On Road

‘छोटे महाराज’ म्हणून प्रसिद्ध असलेले योगगुरू स्वामी आनंद गिरी यांची जीवनशैली सामान्य साधूंसारखी नव्हती. महागड्या गाड्यांमध्ये प्रवास करणे, महागडे मोबाईल वापरणे आणि फोटो काढणे त्यांना आवडत होते. कारपासून बाईकपर्यंत त्यांचे फोटो आपल्याला पाहायला मिळतील.

Untitled Design

आनंद गिरी यांचे वेगवेगळ्या महागड्या गाड्यांसह पोज देताना फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये पजेरो, बीएमडब्ल्यू आणि लॅम्बोर्गिनी सारख्या गाड्यांचा समावेश आहे.

Whatsapp Image 2021 09 21 At 3.55.25 Pm

तसेच एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, मी कोट्याधीश माणूस नाही आणि मला खूप मोठे होण्याची आवड नाही. लोक आणि त्यांचे शिष्य त्यांना जे देतात त्यातूनच त्यांचे काम पूर्ण होते. आनंद गिरी यांना फक्त महागड्या गाड्यांची आवड होती असे नाही तर त्यांना बाइक्सचीही आवड असल्याचे दिसते. तसेच त्यांचे काही फोटो बुलेटसह देखील पाहायला मिळतात.

Whatsapp Image 2021 09 21 At 3.55.26 Pm

आनंद गिरी परदेशात योगा आणि प्रवचनासाठी जात असतात. त्यांनी सांगितले होते की जेव्हा त्यांचा गुरूशी म्हणजेच महंत नरेंद्र गिरी यांच्याशी वाद वाढू लागला त्यानंर ते जास्त परदेशात राहू लागले आणि तिथे योगा शिकवू लागले.

Anand

आनंद गिरी यांनी सिडनी, ऑस्ट्रेलिया येथे मुलांसाठी एक शाळा उघडली आहे जी २०१८ मध्ये सुरू झाली. त्याच्यावर ऑस्ट्रेलियामध्येच बलात्काराचा आरोप केला होता. मात्र, त्यांनी तो आरोप फेटाळला आहे.

Anand Giri23

आनंद गिरी सांगतात की त्यांचा तरुणांशी संबंध आहे. तसेच त्यांचे नेत्यांशी संबंध आहेत. त्यांचा विश्वास आहे की जर तुम्ही चांगले काम केले तर जग तुमच्यासोबत फोटो घेणारच, आणि त्यात काहीही चुकीचे नाही.

हे ही वाचा-

बिग ब्रेकींग! आयपीएलमध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव, आयपीएल स्थगित होण्याची शक्यता

पाकिस्तानपेक्षा जास्त सुरक्षित कोणतीच जागा नाही, म्हणणाऱ्या वसीम अक्रमच्या पत्नीला पाकिस्तानी लोकांनीच झोडले

७२ तासात माफी मागा अन्यथा १०० कोटींचा दावा ठोकणार; अनिल परबांकडून सोमय्यांना अल्टिमेटम

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.