Share

Anand Dave : मोहन भागवतांच्या वक्तव्याविरोधात ब्राम्हण महासंघ मैदानात; आनंद दवेंचे RSS वर गंभीर आरोप

Anand Dave Mohan Bhagvat

Anand Dave : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी केलेले एक वक्तव्य आता चर्चेचा विषय बनले आहे. ब्राम्हणांनी पापक्षालन करावं, असे वक्तव्य त्यांनी एका कार्यक्रमात केले होते. मात्र, आता त्यांच्या या वक्तव्याचा ब्राम्हण महासंघाकडून विरोध करण्यात येत आहे.

मोहन भागवत यांनी केलेल्या या वक्तव्यावर ब्राम्हण महासंघाचे प्रमुख आनंद दवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते म्हणाले की, मोहन भागवत यांची मागच्या वर्षभरातली अनेक विधानं बघितली तर निश्चितच ती आक्षेपार्ह आहे अशी हिंदू महासंघाची स्पष्ट भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, ब्राह्मणांनी माफी मागायला पाहिजे हे जे त्यांचे कालचे वक्तव्य होते ते अतिशय चुकीचे आणि अभ्यासरहित आहे असं आमचं स्पष्ट मत आहे. खरंतर आता विषय मिटला आहे. पन्नास, शंभर, दोनशे वर्षांपूर्वी काय झालं हे सगळं विसरून नवीन गाडीत एकत्र बसलो असताना मोहनरावांना ते उगाळण्यात काय अर्थ आहे? हा आमचा प्रश्न आहे, असेही ते म्हणाले.

निश्चितच ब्राम्हणातल्या अनेक लोकांनी काही चुका केल्या असतील, पण त्या चुका समाज म्हणून आम्ही भोगत आहोत. आजही ब्राम्हण समाज ते भोगत आहे. परंतु, त्याविषयी आता कोणाला काही आक्षेपही राहिला नाही, असेही आनंद दवे म्हणाले आहेत.

ज्यावेळी ब्राम्हणांनी काही चुका केल्या असतील त्याचवेळी ब्राम्हण समाजातल्या काही लोकांनी त्यांना विरोधसुद्धा केलेला आहे. परंतु, असे वक्तव्य न करता सरसकट ब्राम्हणांनी पापक्षालन करावं, असे मोहन भागवतांनी म्हटलं आहे. मला असं वाटतं की, मोहनराव तुम्ही पापक्षालन करायची आवश्यकता आहे, असे वक्तव्य दवेंनी केले आहे.

तसेच तुम्हाला अखंड भारत हवा आहे. जेणेकरून पाकिस्तान, बांग्लादेशमधील मुसलमान भारतात येऊन राहतील आणि इथला हिंदू अल्पसंख्यांक होईल. इथला हिंदू नराधमांच्या हातात देण्याचं पाप करण्याचा विचार तुम्ही करत आहात. त्यामुळे तुम्ही पापक्षालन केलं पाहिजे. तुम्ही महाराष्ट्रात नाही भारतात जातीवाद वाढवत आहात, असा आरोपही आनंद दवे यांनी मोहन भागवतांवर केला आहे.

महत्वाच्या बातम्या
mohan bhagwat : प्रत्येकच जातीच्या पुर्वजांनी चुका केल्यात त्यामुळे आता…; मोहन भागवतांचे खळबळजनक विधान
Mohan Bhagwat :  आपला डीएनए एक असला तरी, मोहन भागवतांच्या उपस्थितीत मुस्लीम नेत्याचं मोठं विधान
‘पृथ्वीराज’ चित्रपट पाहील्यावर मोहन भागवतांनी दिली प्रतिक्रीया; म्हणाले आता आपण इतिहासाकडे….
प्रत्येक मशिदीत शिवलिंग शोधू नका’; ज्ञानवापी वादावर सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान

 

ताज्या बातम्या इतर राज्य

Join WhatsApp

Join Now