ब्राह्मण महासंघाने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर थेट निशाणा साधला आहे. काल पार पडलेल्या औरंगाबाद येथील सभेत बोलताना राज ठाकरे यांनी भोंग्यावरून राज्य सरकारला नवा अल्टिमेटम दिला आहे. ४ मेपासून कोणाचंही ऐकून घेणार नाही. मशिदीचे भोंगे सुरू झाले की त्यांच्यासमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावणारच, असा इशारा राज यांनी दिला.
‘लाऊडस्पीकर हा काही नवीन विषय नाही. याआधी अनेकांनी हा विषय मांडला आहे आणि मी फक्त त्याला पर्याय दिला आहे. लाऊडस्पीकर लावून तुम्ही गोंगाट करणार असाल तर मशिदीबाहेर आम्ही हनुमान चालिसा लावू, असे राज यांनी म्हंटले. यावर आता ब्राह्मण महासंघाने भूमिका स्पष्ट केली आहे.
ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे (Anand Dave) यांनी माध्यमांशी बोलताना यावर सविस्तर भाष्य केलं आहे. ‘मशिदींवरील भोंगे उतविण्याने हिंदुत्वाचे सर्वाधिक नुकसान होईल,’ अशी भीती देखील त्यांनी व्यक्त केली आहे. आनंद दवे यांनी काही सवाल देखील उपस्थित केले आहे.
वाचा ते नेमकं काय म्हणाले…? “रस्त्यावर नमाज पठण चूकच मग गणपती मंदिर, मांडव, उत्सव, मांडवात होणाऱ्या आरती, त्यापण रस्त्यावरच होत असतात. मिरवणूक, दांडिया यांच काय करणार?”, असे सवाल आनंद दवे यांनी उपस्थित केले. तर आता यावर मनसेकडून येणाऱ्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, ‘भोंगे उतरवणे वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या काळात सुद्धा शक्य झालं नव्हतं. भोंगे उतरवण्याने सर्वाधिक नुकसान हे हिंदुत्वाचं होईल, असे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्टच सांगितलं. स्पिकर खाली आलेच पाहिजेत, तर मग हिंदू उत्सवातले स्पिकर काय करणार? असा संतप्त सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, ‘यात्रा, गणपतीचे मिरवणूक, नवरात्री, शिवजयंती, संभाजी महाराज जयंती, बाबासाहेब आंबेडकर जयंती, प्रत्येक जातीच्या युगपुरुषांचे दिवस, पाडवा यात्रा, दिवाळी पहाट, दहीहंडी हे सगळंच संकटात येईल,’ अशी भीती त्यांनी व्यक्त केली. यावर मनसेकडून काय प्रतिक्रिया येणार हे पाहणे महत्त्वाच ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
रोहितचा मोठा खुलासा; म्हणाला, मी डिप्रेशनमध्ये होतो आणि खोलीत बसून विचार येत होता की…
वेस्ट इंडिज क्रिकेटर्सच्या महिला दिसतात परीपेक्षा सुंदर, स्टाईलमध्ये अभिनेत्रींनाही टाकतील मागे, पहा फोटो
तिरंगा लावून संविधान वाचणार, भाजपला टक्कर देण्यासाठी ‘आप’ संघासारख्या शाखा स्थापन करणार
अशी सेक्स वर्कर जी घ्यायची ग्राहकांचा जीव, लोकांना घरात आणून संबंधांपूर्वी करायची ‘हे’ भयानक कृत्य