‘माझी मम्मी फडफड कोंबडीवाणी मेली’; रुग्णालयाबाहेर काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश

नाशिक ! राज्यात कोरोनामुळे भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. ऑक्सिजन, बेड, लसींचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवू लागला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच मृत्यू होण्याचं प्रमाण वाढत आहे. कोरोनामुळे प्राण गमावलेल्या कुटूंबांचा आक्रोश पाहून मन हेलावून जाते.

आज दुपारच्या सुमारास नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात एक धक्कादायक घटना घडली आहे. ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळती झाली. या ऑक्सिजन गळतीच्या घटनेत २२ रुग्णांचा मृत्यू झाला.

या घटनेमुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. ऑक्सिजन टँकरमध्ये गळती झाल्याने तो सर्वत्र पसरला आहे. या गळतीनंतर ऑक्सिजन पुरवठा तब्बल एक दिड तास खंडित झाला होता. यामुळे सर्वांचा एकच गोंधळ उडाला  यामध्ये २२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आपल्या रुग्णाचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी रुग्णालयाच्या व्यवस्थेवर अनेक सवाल उपस्थित केले. नातेवाईकांच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. त्यांचा आक्रोश पाहून मन हेलावून जात होते. एका महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या मुलीने हॉस्पीटल प्रशासनावर सवाल करत अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

दोन दोन दिवस  लोकांना वेटिंगवर ठेवतात हे हॉटेल आहे का वेटिंगवर ठेवतात. दोन दिवस माझी मम्मी वेटिंगवर होती. त्यानंतर त्यांनी दाखल करून घेतलं. दोन दिवस वेटिंगवर राहा. मग आम्ही तुमचं प्रोसेजर करू असं सांगितलं गेलं. जसं की आम्ही यांच्याकडं नोकरी मागायला आलो आहोत. असं त्या मृत्यूमुखी पडलेल्या महिलेच्या मुलीने म्हणतं संताप व्यक्त केला आहे.

माझी मम्मी क्लीअर झाली होती. फार चांगली होती. जेवण करत होती. अर्ध्या तासापुर्वी ऑक्सिजन संपला, अन् व्हेंटिलेटर बंद पडला. फडफड कोंबडीवाणी मेली ती फडफडून. कुणी आलं नाही तिच्याजवळ, मरुन गेली ती. फक्त माझी मम्मीचं नाही. सगळे मेले पुर्ण वॉर्डचे लोक मेले. असं म्हणत आईच्या आठणीने व्याकूळ झालेल्या मुलीने मन हेलावून टाकणारा आक्रोश केला.

मृताच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत
नाशिकचे पालकमंत्री छगन भूजबळ यांनी मृताच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून ५ लाखांची मदत दिली जाणार असल्याचं सांगितलं.  तसेच घटनेच्या चौकशीचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले असल्याचं छगन भूजबळ यांनी सांगितलं.

दरम्यान आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनूसार भारतात गेल्या २४ तासांमध्ये १,७१६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत देशात १ लाख ८० हजार ५३० रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. सध्या २० लाख ३१ हजार ९७७ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
महत्वाच्या बातम्या-
सावधान! कोरोनापासून बचावासाठी करण्यात येणारे ‘हे’ घरगुती उपाय ठरताहेत घातक
पतीच्या निधनानंंतर कब्रस्थानमध्ये बनवलं महिलेने घर, पतीच्या आवडीचे गाणेही लावते
धक्कादायक! नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीच्या घटनेत २२ जणांचा मृत्यू

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.