भारतात विविध कायदे बनवून देखील बालविवाहांचे प्रमाण कमी झालेले नाही. आजही ग्रामीण भागात अनेक ठिकणी बालविवाह होतात. प्रसिद्ध उद्योजिका कल्पना सरोज यांचा देखील वयाच्या १२व्या वर्षी विवाह झाला होता. अगदी लहान वयात लग्न झाल्याने त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.
सासरी त्यांना घरातील सर्व कामे करायला सांगितली जात होती. घरातील लोक येता जाता त्यांना शिव्या देत असतं. इतकंच नाही तर साधे केस बांधायचे म्हंटले तरी त्यांना “कुठे नाचायला जाणार आहेस.” असे टोमणे ऐकायला मिळायचे. मात्र लग्नानंतर ६ महिन्यांनी त्यांच्या वडिलांनी स्वतःच्या डोळ्यांनी आपल्या मुलीचे हाल बघितले.
यावेळी कल्पना सरोज यांच्या वडिलांनी दुःखी होऊन त्यांना माहेरी आणले. यावेळी त्यांनी आपल्या मुलीला सांगितले की,” जे काही झाले ते वाईट स्वप्न म्हणून विसरून जा आणि नवीन जीवन जगायला सुरुवात कर.” विशेष म्हणजे कल्पना यांचे वडील पोलीस हवालदार होते. त्यांनी या घटनेनंतर आपल्या मुलीला पुढील शिक्षण दिले.
परंतु, मधल्या काळात कल्पना व त्यांच्या वडिलांना आजूबाजूच्या लोकांनी भरपूर त्रास दिला. लोक त्यांना टोमणे द्यायचे, शिव्या द्यायचे. यामुळे कल्पना यांना प्रचंड त्रास झाला. मनात नको ते विचार येऊ लागले. म्हणून, त्यांनी घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला व त्या मुंबई मध्ये आल्या.
मुंबईमध्ये त्यांनी दिवसा दोन रुपये हजेरीवर एका मिल मध्ये काम सुरू केले. दरम्यान त्यांना पैशाचे महत्त्व कळल्याने त्यांनी व्यवसाय करायचा ठरवला. त्यासाठी 50 हजारांचे कर्ज घेऊन बुटीक व फर्निचरची विक्री सुरू केली. याच काळात कल्पना सरोज यांनी सुशिक्षित बेरोजगार मुलांची संघटना स्थापन केली. यामधून लोकांना रोजगार दिले जाऊ लागले. यावेळी अनेक लोक त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी कल्पना यांच्याकडे येऊ लागले.
मध्येच एका भूखंडाचा प्रश्न सोडवत असताना त्यांना बिल्डर होण्याची कल्पना सुचली. नंतर त्या कारखान्याच्या संचालक झाल्या. यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. एकेकाळी रस्त्यावर रिक्षातून जायला पैसे नसणाऱ्या कल्पना सरोज यांच्या कंपनीच्या नावावर मुंबई सारख्या शहरात दोन रस्ते आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडून पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
- sikandar shaikh : वडील हमाली करताना मुलगा पैलवानी करून बनला सिकंदर, कुस्तीत जिंकल्या २४ बुलेट अन् थार
- रितेशच्या वेडने अर्जुन कपूरच्या कुत्तेला अक्षरक्ष: झोपवले, बाॅलीवूडला दाखवली मराठीची ताकद
- अशोक सराफ देताहेत ‘या’ गंभीर आजाराशी झुंज; पत्नी निवेदीता म्हणाल्या ‘त्यांना बोलताही येत नाही