Nawab Malik : मुंबई सत्र न्यायालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. ईडीकडून त्यांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक झाली आहे. कुर्ल्यातील रूग्णालयात सध्या नवाब मलिक यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच ते न्यायालयीन कोठडीतच तिथे उपचार घेत आहेत.
न्यायालयाच्या आदेशानुसार, घाटकोपर येथील मेडिकल स्कॅन सेंटरमध्ये नवाब मलिक यांना चाचणीसाठी नेण्यात आले होते. या चाचणीमध्ये त्यांचे अवयव निकामी झाल्याचे समोर आले. त्यामुळे नवाब मलिक यांना पुन्हा रुग्णालयात नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
मुंबईतील कुर्ला येथील एका खाजगी रुग्णालयात मे महिन्यापासून नवाब मलिक दाखल आहेत. त्यांच्यावर सध्या औषधोपचार सुरू आहेत. तसेच त्यांच्या शारीरिक स्थितीनुसार एक आठवड्यानंतर त्यांना पुन्हा मेडिकल स्कॅनकरीता नेण्यात येणार आहे. ॲड. जानकी गर्दे यांनी नवाब मलिक यांच्यावतीने बाजू मांडत असताना मुंबई सत्र न्यायालयाला ही माहिती दिली. यानुसार २४ ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.
दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला ईडीने ताब्यात घेतले व त्याची चौकशी केली होती. त्यावेळी ईडीच्या तपासात मलिक यांचा संबंध दाऊदशी संबंधित सुमारे ३०० कोटी मालमत्तेचा व्यवहार करणाऱ्या कंपनीशी असल्याचे आढळले. त्यानुसार मलिक यांच्यावर कारवाई करत ईडीने २३ फेब्रुवारी रोजी त्यांना अटक केली होती.
नवाब मलिक यांनी याआधीसुद्धा न्यायालयात अनेकदा जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. परंतु प्रत्येकवेळी त्यांचा अर्ज फेटळण्यात आला. त्यानंतर आता परत त्यांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. जवळपास पाच महिने उलटूनही तपास यंत्रणेकडून आपल्या विरोधात सबळ पुरावे दाखल करण्यात आले नसल्याचा दावा त्यांनी या याचिकेतून केला आहे.
नवाब मलिक यांच्यावतीने या याचिकेवरील युक्तिवाद पूर्ण झाला. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल शुक्रवारी न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर बाजू मांडणार होते. परंतु, शस्त्रक्रियेमुळे एएसजी सुनावणीसाठी हजर राहू शकणार नाहीत, अशी माहिती विशेष सरकारी वकील सुनील गोन्साल्विस यांनी न्यायालयाला दिली.
महत्वाच्या बातम्या
Rakesh Jhunjhunwala Died : प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचे अचानक निधन
मेटेंना अपघातानंतर १ तास मदतच मिळाली नाही, अखेर रस्त्यावर झोपून गाडी थांबवली; ड्रायव्हरने सांगीतला थरार
vinayak mete died : शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे कार अपघातात निधन; महाराष्ट्रावर शोककळा
VIDEO: पुणे महापालिकेकडून राष्ट्रध्वजाचा अपमान, वसंत मोरेंनी थेट पोलिसांत केली तक्रार