Share

Cyrus Mistry : ‘असा’ झाला सायरस मिस्रींचा मृत्यू; ६० दिवसांनी शुद्धीवर आलेल्या प्रत्यक्षदर्शीने सांगीतला अपघाताचा थरार

sayras mistri

Cyrus Mistry : उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा कार अपघातात मृत्यू झाल्यानंतर आता याबद्दल एक सर्वात मोठा खुलासा झाला आहे. सप्टेंबरमध्ये, त्यांच्या मर्सिडीज-बेंझ कारचा महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील एका पुलावर अपघात झाला होता. त्यावेळी ती गाडी डॉ.अनाहिता पंडोले चालवत होत्या.

डॉ. डॉ.अनाहिता पंडोले आणि त्यांचे पती दारियस पंडोले गंभीर जखमी झाले होते. तर सायरस मिस्त्री आणि आणखी एक या अपघातात मृत्युमुखी पडला होता. कार अपघातातून बचावलेले दारियस पंडोले आता बरे झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

त्यानंतर पोलिसांनी आता दारियस पंडोले यांचा जबाब नोंदवला आहे. यात त्यांनी सांगितले की, त्यांची पत्नी डॉ.अनाहिता तिसर्‍या लेनमधून गाडी चालवत होती. दुसऱ्या लेनमध्ये गाडी नेत असताना त्यांच्या पुढे जात असलेल्या दुसर्‍या एका कारने लेन बदलली. मात्र, अचानक एक ट्रक पाहून अनाहिता तिसर्‍या लेनवरून गाडी दुसऱ्या लेनवर आणू शकली नाही आणि यादरम्यान ती पुलाच्या रेलिंगला धडकली आणि अपघात घडला.

महाराष्ट्रातील पालघरमधील सूर्या नदीवरील पूल अरुंद असून तिथेच हा अपघात झाला होता. मंगळवारी पालघरमधील कासा पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांनी दारियस पंडोले (६०) यांचा त्यांच्या राहत्या घरी जबाब नोंदवला. ४ सप्टेंबर रोजी याच पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला होता.

टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री (५४) आणि त्यांचा मित्र जहांगीर पंडोले यांचा पुलाच्या रेलिंगला कार धडकून मृत्यू झाला. तर अनाहिता (५५) आणि त्यांचे पती दारियस पंडोले यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

गेल्या आठवड्यातच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. दक्षिण मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवला. दारियस पंडोले यांना ४ सप्टेंबरच्या अपघाताची घटना सहजासहजी आठवत नव्हती. आठवण करून दिल्यावर त्यांनी सांगितले की, डॉ. अनाहिता तिसर्‍या लेनमधून गाडी चालवत होत्या. त्यांच्या पुढे जाणारी दुसरी कार तिसर्‍या लेनवरून दुसऱ्या लेनमध्ये गेली.

यावेळी त्यांच्या पत्नीनेही कार दुसऱ्या लेनमध्ये नेण्याचा प्रयत्न केला, पण त्या लेनमध्ये ट्रक आल्याने तिला दुसऱ्या लेनमध्ये गाडी घेता आली नाही. या दरम्यान ते रेलिंगला धडकले. अपघातात मृत्युमुखी पडलेला जहांगीर पंडोले हा दारियस यांचा भाऊ आहे. मिस्त्री यांच्यासह हे सर्वजण गुजरातमधील उडवाडा येथून मुंबईला परतत होते.

पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी पंडोले त्यांचा जबाब नोंदवण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. मात्र, त्यांच्या पत्नी डॉ.पंडोले यांचा जबाब नोंदवावा लागणार आहे. डॉ. पंडोले अजूनही त्या अपघातातून सावरत आहेत. मर्सिडीज बेंझच्या अपघाताच्या अंतिम तपास अहवालाचीही प्रतीक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या
AFG Vs AUS : बलाढ्य ऑस्ट्रेलियाला नवख्या अफगाणिस्तानने रडवले, राशीदने एकट्याच्या बळावर…
Eknath Shinde : उद्धवसाहेबांना भाजपशी युती करुन घ्या, असं सांगितलं होतं पण ते म्हणाले…; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा
Amruta Fadanvis : ‘कोणत्या महीलेनं कसं जगाव हे तुम्ही सांगू नका’; भिडेंच्या कुंकवाच्या वक्तव्यानंतर अमृता फडणवीस स्पष्टच बोलल्या 
Ajay Devgan : ५१ व्या वर्षीही अविवाहीत का आहेस? तब्बू म्हणाली, ‘या’ अवस्थेला अजय देवगण आहे जबाबदार

 

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now