दिशावर झालेल्या सामूहिक बलात्काराचे सत्य सुशांतला जाणून घ्यायचे होते; हत्येचाही संशय होता

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतची एक्स मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यूप्रकरणी तपासत अनेक खुलासे समोर येत आहेत. यामुळे आता दिशा मृत्यूप्रकरणात देखील गुंता वाढत चालला आहे. त्यातच आता एका प्रत्यक्षदर्शीने मोठा खुलासा केला आहे.

दिशाच्या मृत्यूच्या दिवशी पार्टीमध्ये तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचा खुलासा प्रत्यक्षदर्शीने एका वृत्तवाहिनीकडे केला. याचबरोबर त्या पार्टीमध्ये बॉलिवूडमधला एक स्टारसुद्धा उपस्थित होता, असेही त्याने सांगितले आहे. प्रत्यक्षदर्शीने केलेल्या या धक्कादायक खुलास्याने खळबळ उडाली आहे.

तसेच ‘पार्टीमध्ये एकूण सहा जण उपस्थित होते. दिशाचा होणारा पती रोहन रॉयसुद्धा उपस्थित असल्याचं समजतं आहे. चार जणांनी मिळून दिशावर बलात्कार केला. दिशाचा आवाज बाहेर ऐकू जाऊ नये म्हणून मोठ्या आवाजात गाणी लावली होती,’ अशी माहिती प्रत्यक्षदर्शीने सांगितली आहे.

दरम्यान, प्रत्यक्षदर्शीने पुढे माहिती देताना सांगितले की, सुशांत सिंग राजपूत यांनाही त्याच्या मॅनेजरसोबत काय झाले होते, हे जाणून घ्यायचे होते. त्यामुळे त्यांना खूप दुःख झाले होते. त्यांनी आपल्या मित्रांना फोन करून हत्येचा संशय व्यक्त केला असल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले आहे.

याचबरोबर मुंबईतील एका इमारतीतील चौदाव्या मजल्यावरून पडल्यामुळे दिशाचा ८ जून रोजी मृत्यू झाला. दिशाच्या मृत्यूनंतर एका आठवड्यानंतर १४ जून रोजी सुशांतचा मुंबईतील त्याच्या राहत्या घरी मृतदेह आढळला. यानंतर या दोन्हीही प्रकरणात तपासादरम्यान वेगवेगळे खुलासे समोर येत आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या
पुण्यातील अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणानले; गुन्हेगारांचे कर्दनकाळ अभिनव देशमुख नवे एसपी
खळबळजनक! त्या पार्टीमध्ये दिशावर झाला सामूहिक बलात्कार; प्रत्यक्षदर्शीचा खुलासा
या झाडाच्या देखभालीचा खर्च आहे १५ लाख आणि २४ तास कडक पहारा; काय खास आहे या झाडामध्ये?
सुशांत आणि रियाचा ‘तो’ व्हिडीओ झाला व्हायरल; समोर आले ‘ते’ कृत्य

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.