बडवायझर बिअर कंपनीचा कर्मचारी १२ वर्ष बिअरच्या टाकीत मुतत होता ? वाचा काय आहे सत्य

नवी दिल्ली | सोशल मीडियावर मद्यप्रेमींना सतावणारी एक बातमी सध्या व्हायरल होत आहे. ती म्हणजे बडव्हायझर बिअर कंपनीचा एक कर्मचारी तब्बल १२ वर्ष बिअरच्या टाकीत मूत्रविसर्जन करत होता.

नक्की या बातमीमागच सत्य काय आहे. अनेकजण या बातमीला शेअर करत आहेत. तुम्ही जर ही बातमी शेअर करत असाल तर थांबा. ही बातमी खोटी आहे असा कोणताही प्रकार घडलेला नाहीये.

एका वेबसाईटने उपहासात्मक पद्धतीने हे वृत्त दिलं होतं. पण काही वेळातच ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. अनेकांनी ही बातमी वाचली आणि सगळीकडे शेअर केली. त्यामुळे ही बातमी व्हायरल झाली. पण ही बातमी पूर्णपणे खोटी आहे.

ज्या वेबसाईटवर ही बातमी टाकण्यात आली होती त्या वेबसाईटचं नाव foolishhumour.com असं आहे. तुम्ही जर बातमी नीट वाचली तर शेवटी लिहिलेलं आहे की ही वेबसाईट फक्त मनोरंजनासाठी आहे. सगळी माहिती काल्पनिक असून मनोरंजनासाठी बनवली आहे. त्यात काही सत्यता नाही.

अनेकांनी तर या बातमीवरून जोक आणि मीम तयार करून सोशल मीडियावर टाकले आहेत. त्यामुळे सर्व बातम्या पुढे पाठवायच्या आधी एकदा पडताळणी करणे गरजेचे आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.