Kerala : लॉटरी म्हटलं की सारा नशिबाचाच खेळ. लॉटरी कुणाचे नशीब उजळवते तर कुणाचे खिसे पार रिकामे करते. मात्र, ज्याचे नशीब उजळते त्याची चांगलीच कमाई होते. अशाच लॉटरीमुळे एका ऑटोरिक्षा चालकाचे नशीब उजळले आहे.
केरळ येथील एका ऑटोरिक्षा चालकाला मोठी लॉटरी लागली आहे. एका रात्रीत तो श्रीमंत बनला आहे. लॉटरी जिंकणाऱ्या या व्यक्तीचे नाव अनुप आहे. तो श्रीवराहम येथील रहिवासी आहे. अनुपला छोटीमोठी नाही तर तब्बल २५ कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे.
खरंतर यावर त्याचा स्वतःचाही विश्वास बसत नाही आहे. ओनम सणाला ओनम लॉटरीचे आयोजन केले गेले होते. अनुपने या लॉटरीचे पहिले तिकीट घेतले परंतु, त्याला ते आवडले नाही. त्यानंतर त्याने दुसरे तिकीट खरेदी केले. याच तिकिटाने अनुपचे नशीब चमकले.
अनुपची परिस्थिती चांगली नसल्याने तो मलेशियाला कुकची नोकरी करण्यासाठी जाणार होता. त्यासाठी त्याने बँकेकडून तीन लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याला लॉटरी लागली व तो श्रीमंत बनला.
गेल्या २२ वर्षांपासून लॉटरीची तिकिटे खरेदी करत असून आतापर्यंतच्या शेकडो तिकिटांमध्ये त्याने जवळपास ५००० रुपये जिंकले असल्याचे अनुपने सांगितले. पुढे त्याने सांगितले की, मला जिंकण्याची अपेक्षा नव्हती. त्यामुळे मी टीव्हीवर लॉटरीचा निकाल पाहत नव्हतो. मात्र, माझा फोन बघितल्यानंतर मी लॉटरी जिंकलो असल्याचे मला समजले.
माझा यावर विश्वास बसत नव्हता त्यामुळे मी माझ्या पत्नीला मेसेज दाखवला. कर कपात केल्यानंतर अनुपला १५ कोटी रुपये मिळणार आहे. या उरलेल्या पैशातून घर बांधणार असल्याचे व त्याच्यावर असलेले कर्ज फेडणार असल्याचे त्याने सांगतले.
महत्वाच्या बातम्या
माणुसकीला काळीमा! हप्ता भरला नाही म्हणून फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गरोदर मुलीला चिरडले
आदित्य ठाकरे अडचणीत? प्रदूषण महामंडळाकडून 100 कोटी घेतल्याचा आरोप, चौकशी होण्याची शक्यता
उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा मुलगा असल्याची शंका आहे का? ची जहरी टीका
रामदास कदमांना वेड्यांच्या इस्पितळात दाखल करा, त्यांची वैचारिक पातळी.., भास्कर जाधव भडकले