Sanjay Raut : महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापलेले आहे. शिवसेनेतील बंडखोरीनंतर ठाकरे आणि शिंदे गट मूळ शिवसेना पक्षावर आपला दावा ठोकत आहे आहेत. त्यासाठी दोन्ही गट कायदेशीर लढाई लढत आहेत. त्यासोबतच हे दोन्ही गट रस्त्यावर सुद्धा लढाई लढत आहेत.
दोन्ही गटात रोज नव नवीन आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झडत असतात. या लढाईत ठाकरे गटाला त्यांच्या एका नेत्याची उणीव प्रकर्षाने जाणवत आहे. हे नेते सध्या तुरुंगात आहेत. ते नेते दुसरे कोणी नसून शिवसेनेचे राज्यसभा खासदार आणि राष्ट्रीय प्रवक्ते संजय राऊत आहेत.
ते ज्यावेळी तुरुंगाबाहेर होते. त्यावेळी तेच शिवसेनेचा आणि बंडखोरीनंतर ठाकरे गटाचा एकमात्र आवाज होते. ते सतत आपल्या विरोधकांना धारेवर धरत. ते एकदम आपल्या खास शैलीत विरोधकांच्या प्रत्येक टीकेला उत्तर देत.
त्यांच्या याच भूमिकेमुळे त्यांना जेलमध्ये जावे लागले असे त्यांचे समर्थक म्हणतात. त्यांना सतत उद्धव ठाकरेचे आणि बाळासाहेबांचे समर्थक म्हणून ओळखले जात. आता त्यांचाच एक किस्सा सुनील राऊत यांनी सांगितला आहे.
सुनील राऊतांनी सांगितले की, संजय राऊतांना कॉम्प्रोमाइज करण्यासाठी सांगण्यात आले होते. पण संजय राऊतांनी त्याला स्पष्ट नकार दिला. ते म्हणाले, मी जर आज कॉम्प्रोमाइज केले तर मी वरी गेल्यावर बाळासाहेबांना कसं तोंड दाखवेल. एक निष्टावंत शिवसैनिक की गद्दार म्हणून?
सुनील राऊतांनी सोबतच भाजपावर सुद्धा टीका केली आहे. ते म्हणाले, भाजपा शिवसेना संपवण्याचा डाव रचत आहे. यासाठी ते एकनाथ शिंदेची मदत घेत आहेत. मी तुम्हाला सांगतो की संजय राऊत यांनी एकही रुपयाचा भ्रष्टाचार केलेला नाही.
महत्वाच्या बातम्या
Shinde Group : “शिंदे गटाला RSS च्या बाळासाहेब देवरसांचे नाव मिळाले, भाजपने डाव साधला”
Dipak Kesarkar : दिपक केसरकर बाजारबुणगे, हा माणूस कधीच कुणाचा होऊ शकला नाही, मंत्रीपदाचे गाजर दिसताच…
Mulayam Singh Yadav : फक्त राजकीय वारसाच नाही तर प्रचंड मोठी संपत्ती मागे ठेवून गेलेत मुलायमसिंग; आकडा ऐकून डोळे फिरतील