Milk : पेट्रोल, डिझेल, गॅसच्या वाढत्या भावामुळे त्रस्त नागरिकांना आणखी एक धक्का बसला आहे. पुन्हा एकदा अमूल दुधाची किंमत वाढली आहे. लिटरमागे २ रुपयांनी ही वाढ करण्यात आली असून उद्यापासून हे नवे दर लागू होणार आहेत.
मुंबई, अहमदाबाद, गुजरात, दिल्ली, एनसीआर आणि पश्चिम बंगाल याठिकाणी हे नवीन दर लागू होणार असल्याची माहिती अमूल कंपनीने दिली आहे. तसेच नवीन किमतींनुसार, आता अमूल शक्ती दूध ५० रुपये प्रति लिटर, अमूल गोल्ड ६२ रुपये प्रति लिटर आणि अमूल ताझा ५६ रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध होणार आहे. हे नवीन दर १७ ऑगस्टपासून लागू होणार आहेत.
कंपनीच्या सांगण्यानुसार, दुधाचा उत्पादन आणि ऑपरेशन खर्च वाढल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. दूध उत्पादन खर्चात सातत्याने वाढ होत असल्याचे गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनचे म्हणणे आहे. तसेच ऑपरेशन आणि उत्पादनाच्या एकूण खर्चात वाढ झाल्यामुळे ही वाढ झाली आहे.
मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पशुखाद्याच्या किमतीत २० टक्क्यांनी वाढ झाली असल्याचेही अमूलने सांगितले. वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर आमच्या सदस्य दूध संघानी गेल्या वर्षीच्या तुलनेत ८ ते ९ टक्क्यांनी शेतकर्यांच्या दुधाच्या किमती वाढवल्या आहेत. या वाढलेल्या खर्चाचा काही भाग आता ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यात आला असल्याचे अमूलने निवेदनात म्हटले आहे.
याआधी अमूलने १ मार्च २०२२ रोजी दुधाच्या दरात २ रुपयांनी वाढ केली होती. त्यांनतर आता परत २ रुपयांनी दूध महागले आहे. महाराष्ट्रासोबतच अनेक राज्यांमध्ये हे नवीन दर लागू होणार आहेत.
वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर आता दूधही महागले असल्याने नागरिकांना जोरदार फटका बसला आहे. तसेच सर्वसामान्यांच्या खिशाला याची मोठी झळ सोसावी लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या
Prajakta Mali : ‘हॅलो’ एवजी ‘वंदे मातरम’ला प्राजक्ता माळीचा पाठिंबा, अटलजींची कविता शेअर करत म्हणाली..
मला संपवायला निघालेल्यांचा सहा महिन्यात…, किरण मानेंची पुन्हा वादग्रस्त पोस्ट
Drugs: गुजरातमध्ये चाललंय काय? पुन्हा एकदा १०२६ कोटींचं ७०४ किलो ड्रग्स जप्त, मुंबई टीमची कारवाई
Divorce: घटस्फोटानंतर पत्नीचे परपुरुषासोबत संबंध असले तरी तिला पोटगी द्यावी लागणार- उच्च न्यायालय