काय होती आमटे कुटुंबातील वादाची कारणे? का करावी लागली शीतल आमटेंना आत्मह.त्या; जाणून घ्या…

नागपूर । सामाजिक कार्यकर्त्या आणि ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या नात डॉ. शीतल आमटे यांनी विषारी इंजेक्शन टोचून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे राज्यात सर्वांना धक्का बसला. आमटे परिवार गेल्या अनेक वर्षांपासून समाज कार्यात काम करत असून अनेक समाज उपयोगी उपक्रम ते राबवत असतात.

या घटनेमुळे सामाजिक क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या आनंदवन या सामाजिक उपक्रमाबद्दल बरेच वाद होते. या सर्व वादांच्या केंद्रस्थानी असलेल्या शीतल आमटे यांनी अखेर आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले.

शीतल आमटे या शिक्षणाने डॉक्टर होत्या. त्या अपंगत्व विशेषज्ज्ञ म्हणूनही प्रसिद्ध होत्या. त्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांच्या नात होत्या. डॉ. विकास आमटे आणि डॉ. भारती आमटे त्यांचे आई-वडील आहेत. बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या आणि सामाजिक क्षेत्रात आपल्या सेवाकार्याने वेगळी ओळख निर्माण केलेल्या महारोगी सेवा समितीच्या त्या मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या.

तसेच शीतल आमटे संयुक्त राष्ट्राच्या वर्ल्ड इनोव्हेशन ऑर्गनायझेनच्या समन्वयक म्हणूनही काम करत होत्या. त्यांना त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील कामासाठीच रोटरी व्हॅकेशनल इक्सलन्स पुरस्कारही भेटला होता. त्या इंक फेलोवशिपच्याही मानकरी ठरल्या होत्या. त्या एक्स्प्रेस हेल्थ पुरस्कार आणि एक्स्प्रेस हेल्थकेअर पुरस्कार निवड समितीच्याही सदस्य होत्या.

त्यांना लॅन्सेट आयोगाने त्यांना वैद्यकीय क्षेत्रातील नेतृत्वासाठी पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ (दिल्ली) या संस्थेच्या त्या सल्लागार होत्या.

बाबा आमटे यांच्यानंतर त्यांची मुले डॉ. विकास आमटे आणि डॉ. प्रकाश आमटे यांनी हे सामाजिक काम पुढे नेण्याचा निर्णय घेतला. काही काळाने आनंदवन प्रकल्पनाची जबाबदारी डॉ. विकास आमटे आणि त्यांच्या कुटुंबाकडे देण्यात आली. तर डॉ. प्रकाश आमटे आपल्या कुटुंबासह लोकबिरादरी प्रकल्पाचे काम सुरु करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा येथे गेले.

तेथे त्यांनी आदिवासींमधील गोंड, माडिया समाजातील लोकांच्या आरोग्याचे प्रश्न, शिक्षण आणि उपजीविका यासाठी अनेक उपक्रम सुरु केले. तसेच वेगवेगळे समाज उपयोगी उपक्रम राबवून त्यांनी मोठे कार्य केले.

सर्व अखंडीत सुरू असताना आनंदवनात अनेक वर्षांपासून काम करणारे विकास आमटे यांचे जवळचे सहकारी राजू सौसागडे यांनी शीतल आमटे आणि गौतम कराजगी यांच्यावर मनमानी कारभाराचा आणि आपला छळ केल्याचा गंभीर आरोप केला. या प्रकरणी त्यांनी थेट पोलीस स्टेशनमध्येही तक्रार दाखल केली.

बाबा आमटे यांचे सहकारी शंकरदादा जुमडे यांचा मुलगा विजय जुमडे यांनीही या नव्या प्रशासनावर गंभीर आरोप केले. आणि आनंदवनात वाद होण्यास सुरुवात झाली. यानंतर अनेक घडामोडी घडल्या. आनंदवन प्रकल्पातील काही सहकाऱ्यांनी शीतल आमटे यांच्या कामावर अनेक गंभीर आरोप केले.

शीतल आमटे यांच्या या जाहीर आरोपसत्रानंतर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे, डॉ. विकास आमटे यांच्यासह कुटुंबातील सर्व सदस्यांनी एक जाहीर निवेदन देत शीतल आमटे यांच्या आरोपांचा जाहीर निषेध केला. तसेच लोकांचा गैरसमज होऊ नये म्हणून हे संयुक्त निवेदन दिल्याचे आमटे कुटुंबीयांनी सांगितले.

शीतल आमटे या सध्या मानसिक ताण आणि नैराश्याचा सामना करत असल्याचीही कबुली आमटे कुटुंबीयांनी दिली होती. अखेर त्यांनी आज आत्महत्या केली. यामुळे संपूर्ण राज्यात सर्वांना एकच धक्का बसला.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.