म्हणून आई अमृता साराला म्हणाली होती तु तर भिकारी दिसत होतीस

फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक बालकलाकार खुप प्रसिद्ध आहेत. लहानपणी त्यांनी चित्रपटांमध्ये काम करून खुप प्रसिद्धी मिळवली होती. मोठे झाल्यानंतरही ते लोकांमध्ये तेवढेच प्रसिध्द होते. अशीच एक बालकलाकार म्हणजे सारा अली खान.

साराने खुप कमी वेळात बॉलीवूडमध्ये खुप जास्त यश मिळवले आहे. तिच्या सौंदर्याने अनेकांना घायाळ केले आहे. तर तिच्या अभिनय कौशल्याने लोकांची मने जिंकली आहेत. सारा सध्या बॉलीवूडमधल्या सर्वात प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.

सारा तिच्या हसमुख स्वभावामूळे देखील खुप प्रसिद्ध आहे. साराचे फॅन्स नेहमीच तिच्या प्रत्येक गोष्टीला एन्जॉय करत असतात. सारा तिच्या क्वूट एक्सप्रेशन्समूळे देखील तिच्या फॅन्समध्ये चर्चेत असते. सारा आत्ता जेवढी क्वूट दिसते तेवढीच क्वूट ती तिच्या बालपणात देखील होती.

साराने तिच्या एका मुलाखतीमध्ये तिच्या लहानपणीचा एक किस्सा सांगितला होता. साराचे वागणे बघून लोकांनी तिला भिकारी समजून पैसे द्यायला सुरुवात केली होती. जाणून घेऊया नक्की काय आहे हा किस्सा.

सारा अली खान अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंगची मुलगी आहे. त्यामुळे ती लहानपणापासूनच खुप लाडात आणि आरामात वाढलेली आहे. साराला लहानपणापासूनच डान्स आणि अभिनयाची खुप आवड आहे.

सारा लहान होती तेव्हा ती तिच्या आई वडिलांसोबत बाहेर देशात फिरायला गेली होती. साराला फिरायला खुप आवडत होते. म्हणून सैफ आणि अमृता तिला घेऊन नेहमीच बाहेर फिरायला जायचे. सारासोबतसोबत तिचा लहान भाऊ देखील होता.

एका ठिकाणी सैफ आणि अमृता दुकानात काहीतरी खरेदी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी सारा आणि तिच्या भावाला बाहेर थांबायला सांगितले. साराने देखील ही गोष्ट ऐकली होती. सारा दुकानाच्या बाहेर थांबली होती.

खुप वेळ सैफ आणि अमृता दुकानातून बाहेर आले नाहीत. साराला अचानक डान्स करायची इच्छा झाली. म्हणून साराने कोणताही विचार न करता तिथेच डान्स करायला सुरुवात केली. डान्स करताना सारा खुप क्वूट दिसत होती.

साराला रस्त्यावर डान्स करताना पाहून तिथल्या लोकांनी तिला भिकारी समजून पैसे द्यायला सुरुवात केली. दुकानातून बाहेर आल्यानंतर सैफ आणि अमृताने हे सगळं काही बघितले. आपल्या मुलीला लोकं भिकारी समजत आहेत. ही गोष्ट या दोघांना समजली होती.

पण सैफ आणि अमृता साराला काहीही बोलले नाहीत. त्यांनी हे सगळं काही बघून हसायला सुरुवात केली. अमृता त्यावेळी साराला म्हणाली की, ‘लोकांना तु क्वूट दिसत नव्हती. तर लोकं तुला भिकारी समजत होते. त्यामुळे लोकांनी तुला पैसे दिले’.

सारा आज बॉलीवूडची सुपरस्टार आहे. तिला आज सगळेजण ओळखतात. आज साराने रस्त्यावर डान्स केला तर तिला लोकं ओळखतील. पण सारा तेव्हा लहान होती. साराला तिच्या लहानपणातील ही आठवण खुप आवडते.

महत्त्वाच्या बातम्या –

‘सोनपरी’ मालिकेतील फ्रुटी झाली आहे मोठी; दिसते खुपच सुंदर आणि ग्लॅमर्स पहा फोटो

हॉट आणि ग्लॅमर्स आमिषा पटेलने सांगितले लग्न न करण्यामागचे कारण

मनोजकुमारने डिंपलला मध्यरात्री फोन करून हाॅटेलवर बोलावले; पिसाळलेल्या राजेश खन्नाने काय केले बघा..

माधुरी दिक्षीत तुझी खाजगी प्रॉपर्टी नाही; जॅकी श्रॉफने अनिल कपूरला सुनावले; वाचा पुर्ण किस्सा..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.