अमृता खानविलकरचा कातिलाना अंदाज; फोटो सोशल मिडीयावर झाल्या व्हायरल

मराठी आणि हिंदी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरा म्हणून अमृता खानविलकरकडे पाहीले जाते. तिने तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. आज ती अनेक चित्रपट आणि वेबसीरीजमध्ये काम करत आहे.

अमृताला इंडस्ट्रीमध्ये १८ वर्ष पुर्ण झाली आहेत. या वर्षांमध्ये तिने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. अमृताचे करोडो चाहते आहेत.

तिने तिच्या सौंदर्याने, अभिनयाने आणि फॅशनने लोकांना वेडं लावले आहे. करिअरच्या सुरुवातीला ती एक डान्सर म्हणून प्रसिद्ध होती. त्यानंतर तिने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला.

आज अमृता डान्ससोबतच उत्तम दर्जाचा अभिनय देखील करते. त्यामूळे तिचा चाहता वर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती सोशल मिडीयावर वेगवेगळ्या फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

अमृताने तिचे नवीन फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केले आहे. पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अमृता खुपच कमाल दिसत आहे. तिच्या या फोटो सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. चाहत्यांना तिचा हा कातिलाना अंदाज चाहत्यांना चांगलाच भावला आहे.

अमृताचा फोटो चांगल्याच व्हायरल होत आहेत. या लुकमध्ये ती खुपच ग्लॅमरस दिसत आहे. या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट्स वर्षाव होत आहे. लवकरच अमृता नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

विवाहीत पुरुषांच्या प्रेमात पडू नका; अभिनेत्री नीना गुप्ताचा चाहत्यांना सल्ला

आज करोडोंची मालकीन असणाऱ्या कंगनाकडे एकेकाळी कपडे घ्यायलाही पैसे नव्हते

मला किस करशील का? चाहत्याच्या प्रश्नावर जान्हवी कपूरने दिले भन्नाट उत्तर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.