अमृता फडणवीसांनी भाई जगतापांना थेट पुराव्यासहीत खडसावलं..

मुंबई : मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लेटरबॉम्ब टाकल्यानंतर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देशमुखांचा राजीनामा घेण्यात यावा, असे म्हटले आहे.

याच मुद्द्यावरून, देशमुख यांचा राजीनामा मागणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी आधी पोलिसांची खाती बायकोच्या बँकेत कशाच्या आधारावर वर्ग केली होती याचे उत्तर द्यावे, असे भाई जगताप यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावरूनच अमृता फडणवीस यांनी त्यांना आक्रमक प्रत्युत्तर दिले आहे.

याबाबत अमृता यांनी एक ट्विट करत, “ए भाई , तू जो कोण असशील – माझ्या वर बोट उचलायचं न्हाय ! पोलिसांची खाती तुमच्याच राज्यात तुम्ही ‘UTI बैंक / Axis बैंक ‘ ला योग्यता पाहून दिली होती! लक्षात ठेव, सरळ रस्त्याने चालणाऱ्या माणसांना डिवसायचे न्हाय!” असे म्हटले होते.

दरम्यान, यावर भाई जगताप यांनीही अमृता यांच्या या भाष्यावर प्रतिक्रिया देताना ‘खरं किती टोचतं हे अमृता फडणवीस यांच्या भाषेवरून समोर आलं, मी केवळ सवाल केला होता’, अशी प्रतिक्रिया दिली होती. आता भाईंच्या या प्रतिक्रियेनंतर अमृता यांनी पुन्हा प्रत्युत्तर दिलं आहे.

यावर प्रत्युत्तर देताना त्यांनी २००५ सालचा म्हणजे आघाडी सरकारच्या काळातला आदेशच पुरावा म्हणून दिला आहे. जेव्हा आपण खरे असतो तेव्हा खोटे ऐकून ऐकून खराब वटतंच- हे भाई जगतापला कसे कळणार?. वयाने, अनुभवाने, संपत्तीने एवढे मोठे आहात. थोडं तर खरं बोलायला शिका ! असा टोला अमृता यांनी लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

विवाहीत पुरुषांच्या प्रेमात पडू नका; अभिनेत्री नीना गुप्ताचा चाहत्यांना सल्ला

काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील धुसफूस चव्हाट्यावर! ‘अजित पवारांच्या घरावर मोर्चा काढा, मी सहभागी होईल’

उपचाराअभावी पतीचा मृत्यु झाल्यामुळे तिने भाजी विकून गावात उभे केले मोठे रुग्णालय

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.