मेरे पास ना घर न द्वार, फिर क्या उखाड़ेगी बुल्डोज़र सरकार- अमृता फडणवीस

 

मुबंई | कोरोनाच्या संकटात विरोधी पक्षाकडून राज्य सरकारवर टिका करण्याचे काम सुरूच आहे. तसेच महाराष्ट्रात सुरू असणाऱ्या अनलॉक बाबतही विरोधकांनी राज्य सरकारला लक्ष केले आहे. अशात राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मंदिर उघडण्याबाबत लिहिलेल्या पत्रावरून राज्याचे वातावरण आणखी तापले आहे.

त्या पत्राला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिल्याने, विरोघी पक्षाकडून मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली जात आहे. अशात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनीही मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता. महाराष्ट्रात बार आणि लिकर शॉप्स सगळीकडे सुरू झालीत, मग मंदिरे काय डेंजर झोनमध्ये आहेत का? असा प्रश्न अमृता फडणवीस यांनी उपस्थित केला होता.

अमृता फडणवीस यांच्या या टिकेवर शिवसेनेच्या सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी अमृता फडणवीस यांना उत्तर दिले आहे. आम्ही तोंड उघडले तर अमृता फडणवीसांना तोंड लपवायला जागा राहणार नाही, असे विशाखा राऊत यांनी म्हटले आहे.

आता अमृता फडणवीस यांनी विशाखा राऊत यांना प्रतिउत्तर देत ठाकरे सरकारवर पुन्हा एकदा टीका केली आहे. मेरे पास ना घर न द्वार, फिर क्या उखाड़ेगी बुल्डोज़र सरकार ?, असे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले आहे. अमृता फडणवीस यांनी आता हे ट्विट केल्यानंतर हा वाद आता पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना यांना मंदिर उघडण्याबाबत पत्र लिहले होते. त्या पत्राला ठाकरे स्टाईलमध्ये उत्तर देत, माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची गरज नाही, तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते.

 

महत्वाच्या बातम्या-

भगतसिंग कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटवणार?

भाजपला खिंडार! एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित

समाजात तेढ निर्माण करणाऱ्या न्युज चॅनेल्स विरोधात बजाज मैदानात; पारलेनेही घेतला मोठा निर्णय

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.