अशा नराधामांना सार्वजनिकरित्या फाशी द्यायला पाहिजे: साकीनाका प्रकरणावरुन अमृता फडणवीस भडकल्या

मुंबईच्या साकीनाका परिसरात घडलेल्या बलात्कार प्रकरणामुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. या परिसरात एका महिलेवर बलात्कार करण्यात आला होता. तिला रुग्णालायत दाखल करण्यात आले होते, पण उपचारादरम्यान तिचा मृत्यु झाला आहे.

या घटनेमुळे सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहे. आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. अशा नराधामांना सार्वजनिकरित्या फाशी द्यायला पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी दिली आहे.

साकीनाका येथील बलात्कार करणाऱ्याने दिल्लीतील निर्भया प्रकरणाप्रमाणे हे कृत्य केले आहे. असे गुन्हेगार जीवंत का आहे? ते आमच्या मुलींसाठी धोकादायक आहे. मला ठामपणे वाटते की या नराधामांना सार्वजनिक रित्या फाशी देण्यात यावी, असे अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे.

यावेळी भाजप नेत्यांनीही सरकारवर टीका केली आहे. सरकार म्हणून कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंदवडे महाराष्ट्रात आजपर्यंत निघाले नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज आज असते तर यांचा कडेलोट केला असता, अशी टीका चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.

खरंतर आता मी निशब्द आहे. माझ्याकडे या विषयावर बोलायला माझ्याकडे शब्द नाही. ज्या पद्धतीने पीडितेवर अत्याचार झाला, तो राक्षसी होता. ज्या पद्धतीने हे अत्याचार चालले आहे, ते कुठे तरी थांबायला हवे. महाराष्ट्राच्या महिलांच्या सहनशीलतेचा अंत बघू नका, असेही चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.

तसेच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात वारंवार बलात्कारासारख्या घटना समोर येत आहे. कायद्याचा कुठलाही वचप राहिलेला नाही. सरकारने वारंवार घडणाऱ्या या घटनांची जबाबदारी घ्यायला हवी, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

अंकिता लोखंडेची सुशांत सिंह राजपूतसोबतची पहिली भेट होती खूप भयानक; अभिनेत्रीने जुन्या आठवणींना दिला उजाळा…
खुशखबरः! सरकारकडून मिळणार १५ लाख… जाणून घ्या नेमकी काय आहे योजना
“आरोपींवर कडक कारवाई होईलच, पण वयात येतानाच मुलांवर संस्कार करणं गरजेचं”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.