राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस या त्यांच्या डान्स आणि गाण्यामुळे नेहमीच चर्चेत राहत असतात. नुकतेच त्यांचे एक पंजबी गाणे रिलिज झाले आहे. या गाण्यासंबंधिची माहिती त्यांनी सोशल मिडियाद्वारे शेअर केला आहे.
‘आज मैने मूड बना लिया है’ असे या गाण्याचे बोल आहेत. या व्हिडिओला नेटकरी चांगलाच प्रतिसाद देत आहे. टी सिरिजच्या बॅनरखाली हे गाणे बनले आहे. नवीन गाण्यात त्यांनी डान्सदेखील केला आहे. या गाण्याचा टिझर ५ जानेवारी रोजी प्रदर्शित करण्यात आला होता.
अशातच अमृता फडणवीस यांचा अजुन एक व्हिडिओ चर्चेत आला आहे. अम्रुता यांनीच हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ त्यांनी ट्विटरवर शेअर करत त्यांनी चाहत्यांना चॅलेंज केले आहे.
अमृता फडणवीस यांनी ट्विट करत तुम्ही काय करू शकता ते आम्हाला दाखवा! #moodbanaleya हुक स्टेप चॅलेंज घ्या आणि गाण्याचे हॅशटॅग वापरून तुमची रील तयार करा आणि त्याला आम्हाला टॅग करा. असे आवाहन त्यांनी ट्विटरवर केले आहे.
काही दिवसांपूर्वीच रिलिज झालेल्या या गाण्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अमृता फडणवीस यांचे सर्वत्र कौतुक होतांना दिसत आहे. या गाण्याची सर्वत्र चर्चा होती. अमृता फडणवीस यांचे हे पहिलेच पंजाबी गाणे आहे. चाहत्यांना या गाण्याची फार आतुरता होती.
ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडीओत त्यांनी स्वतःच गाणे गायले आहे. त्यांनी गायलेल्या या गण्यावर नेटकऱ्यांना रिल्स तयार करायला चॅलेंज केले आहे. या गाण्यासोबतच व्हिडीओ मधील त्यांचा ग्लॅमरस लूकचं देखील नेटकरी कौतुक करत आहेत.
ताज्या बातम्या
आर आर पाटलांच्या मुलाने घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; राजकीय वर्तुळात खळबळ
surpriya sule : उर्फी जावेद प्रकरणात आता सुप्रिया सुळेंची उडी; फडणवीसांना म्हणाल्या, देवेंद्रजी…
riteish deshmukh : रितेश देशमुख झाला भावूक, म्हणाला, अशोक मामांसारख्या महानायकासोबत काम करणं म्हणजे..