भाजपच्या पराभवानंतर अमृता फडणवीसांच्या ‘या’ ट्विटची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

मुंबई | विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांवर महाविकास आघाडीने सरशी केली आहे. भाजपला पुणे, नागपूर या बालेकिल्ल्यांसह औरंगाबादमध्येही दारुण पराभवाचा सामना करावा लागला. या निकालावरून आता राजकारण तापले आहे.

आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरु झाले आहे. अशातच नेहमी चर्चेत असलेल्या माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील ट्विट करत भाजपच्या पराभवावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

ट्विट करत अमृता फडणवीस म्हणतात, ”वाईट सुरुवातीचा शेवट चांगला असतो”, असे सूचक ट्विट अमृता फडणवीसांनी केलं आहे. सध्या राजकीय वर्तुळात अमृता फडणवीस यांच्या ट्विटची जोरदार चर्चा सुरु आहे.

हिंमत असेल तर…

पुणे आणि नागपूर पदवीधरची जागा गमावल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हिंमत असेल तर एकएकटे लढा असं आव्हान महाविकास आघाडीतील घटकपक्षांना केलं आहे.

पुढे ते म्हणाले, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे खच्चीकरण झालं असून राष्ट्रवादीने आपली संघटना मजबूत केली असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

एकटं यायचं की आघाडी करून हे आमचे वरिष्ठ ठरवतील….

आम्ही आघाडी करून लढायचे की एक एकट्याने या संबंधीचा निर्णय आघाडीतील सहभागी पक्षांचे वरिष्ठ नेते ठरवतील. आम्हाला कुणी बिन कामाचा सल्ला देण्याची काहीही आवश्यकता नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर केली.

महत्त्वाच्या बातम्या
विजयी होताच अरुण लाड म्हणतात, ‘माझ्या विजयात चंद्रकांतदादांचा मोठा वाटा, कारण…’
नेहा कक्करच्या सुखी संसाराची सुरुवात होतास एक्स बॉयफ्रेंडने केला मोठा खुलासा…
आता भाजपनेही कंगनाला फटकारले; ‘या’ प्रकरणी जाहीर माफी मागण्याचा दिला आदेश

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.