अमृताची आई बेगम रुकसानामूळे अमृता आणि विनोद खन्नाचे झाले होते ब्रेकअप?

८० आणि ९० च्या दशकातील यशस्वी अभिनेत्रींपैकी एक अमृता सिंग तिच्या वैयक्तिक आयूष्यामूळे नेहमीच लोकांमध्ये प्रसिद्ध असायची. सनी देओल, क्रिकेटर रवी शास्त्री, विनोद खन्ना आणि सैफ अली खानसोबतच्या नात्यांमूळे ती मिडीयामध्ये चर्चेत असायची.

रवी शास्त्रीसोबत अमृताचे नाते खुप मजबूत होते. दोघेही लग्नही करणार होते. पण या लव्ह स्टोरीमध्ये विनोद खन्नाने एन्ट्री केली आणि दोघांच्या प्रेम कहानीचा अंत झाला. विनोद खन्ना ७० आणि ८० च्या दशकातील सर्वात हॅंडसम अभिनेते होते.

सामान्य मुलीच काय तर बॉलीवूडच्या अनेक अभिनेत्री देखील त्यांच्या प्रेमात पागल होत्या. पण विनोद खन्ना मात्र कोणत्याही अभिनेत्रीला भाव द्यायचे नाही. कितीही सुंदर मुलगी त्यांच्यासमोर आली तरी ते तिच्यकडे बघायचे नाही. त्यांचा हाच स्वभाव अमृताला आवडला.

विनोद खन्ना सुरुवातीला अमृताला भाव देत नव्हते. ही गोष्ट तिला आवडली नाही. म्हणूनच तिने विनोद खन्नासोबत मैत्री करण्याचा निर्णय घेतला. अमृता विनोदचे मन जिंकण्यात यशस्वी झाली होती. पण तिच्या आईला मात्र हे नातं मान्य नव्हते. त्यामूळे दोघांना वेगळं व्हावे लागले.

अमृता आणि विनोद खन्नाने बटवांरा, सीआयडी आणि धर्म संकटसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. बटवांरा चित्रपटाच्या शुटींग वेळी विनोद आणि अमृताच्या अफेअरच्या बातम्या आल्या होत्या. त्यावेळी अमृता क्रिकेटर रवी शास्त्रीला डेट करत होती.

पण विनोद आणि अमृताच्या लिंकअपच्या बातम्या ऐकल्यानंतर मात्र रवी शास्त्रीने अमृतासोबत ब्रेकअप केले. अमृता विनोद खन्नाची दिवानी झाली होती. पण ते मात्र तिला भाव देत नव्हते. अनेकांनी अमृताला त्यांच्यापासून लांब राहायला सांगितले. पण ती मात्र कोणाचेही ऐकायला तयार नव्हती.

शेवटी अमृताच्या प्रयत्नांना यश मिळाले आणि विनोद खन्ना तिच्याकडे आकर्षित झाले. दोघांच्या अफेअरच्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरल्या. ही गोष्ट अमृताच्या घरी गेली तेव्हा मात्र गोंधळ झाला. कारण अमृताची आई रुकसाना बेगमला हे नात्यं मान्य नव्हते.

यामागचे कारण म्हणजे दोघांच्या वयाचे अंतर. अमृता विनोदपेक्षा आकरा वर्षांनी लहान होती. हिच गोष्ट तिच्या आईला आवडली नव्हती. आईच्या दबावामूळे अमृताने विनोद खन्नासोबत ब्रेकअप केले. दोघांचे नाते खुप चर्चेत होते. पण ब्रेकअपने सर्वांना धक्का दिला.

१९९० मध्ये विनोद खन्नाने कविता खन्नासोबत लग्न केले. तर १९९२ मध्ये अमृताने बारा वर्ष छोट्या सैफ अली खानसोबत लग्न केले. दोघेही त्यांच्या संसारात आनंदी होते. पण त्यांची प्रेम कहानी आजही अनेकांसाठी चर्चेचा विषय आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

महिमा चौधरीची मुलगी दिसते सेम तिच्यासारखी; पहा फोटो

सलमान खानसारख्या मोठ्या कलाकारांसोबत काम करणाऱ्या रिमी सेनने का सोडली फिल्म इंडस्ट्री?

‘द कपिल शर्मा शो’ मधील ‘हे’ दोन कलाकार लवकरचं अडकणार लग्नाच्या बेडीत

लग्नानंतर नवऱ्यासोबत मुंबईत आलिशान घरात राहते नेहा कक्कर; पहा घराचे फोटो

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.