Video; अमृता फडणवीस नवीन गाण्यानंतर झाल्या ट्रोल, लोकं म्हणाली मामी हे सहन होईना…

मुंबई । माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी गायिका अमृता फडणवीस हा सोशल मीडियावर चांगल्याच चर्चेत असतात. त्या राजकीय विषयांवर देखील भाष्य करतात, तसेच त्या अनेक गाण्यांमुळे देखील चर्चेत असतात. असे असताना आता देखील त्या एका गाण्यामुळे चर्चेत आल्या आहेत.

‘मानिके मागे हिते’ या श्रीलंकन गाण्याचं हिंदी वर्जन अमृता यांनी गायले आहे. कालच या गाण्याचा व्हिडीओ अमृता यांनी आपल्या सोशल नेटवर्किंग अकाऊंटवरुन शेअर केला आहे. यामुळे मात्र त्यांच्यावर टीका केली जात आहे. अनेकांनी त्यांना ट्रोल केले आहे.

यामुळे याची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. यामध्ये काहींनी पुरुष दिनाच्या दिवशी हे ऐकावे लागल्याबद्दल कमेंट केली आहे. एकाने म्हटले आहे की अरे मी या पोस्टवर एकटाच हसत आहे. यामुळे अनेकांना फडणवीस यांना ट्रोल करण्याची संधीच मिळाली आहे.

तसेच देवेंद्र फडणवीस यांना हे सहन करायची शक्ती मिळो, असे म्हटले आहे. गेली अनेक वर्षे मिसेस मुख्यमंत्री म्हणून असलेली ओळख अमृता फडणवीसांनी बदलली आहे. अमृता फडणवीस या एक गायिका असून त्यांच्या आवाजातील अनेक गाणी प्रदर्शित झाली आहेत.

नदी स्वच्छता मोहिमेवर अमृता फडणवीसांनी केलेल्या गाण्याला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल करण्यात आले होते. अमृता फडणवीसांनी ‘तिला जगू द्या’ हे गाणं सोशल मीडियावर भाऊबीजेनिमित्त शेअर केले होते. गाण प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

यातील काही कमेंट्स सकारात्मक तर काही ट्रोल करण्याच्या हेतूने करण्यात आलेल्या आहेत. नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर हास्यकल्लोळ उठवला आहे. काहींनी अमृता यांची तुलना ड्रामाक्वीन राखी सावंत सोबतही केली आहे. यामुळे त्या चर्चेत आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.