Amruta Fadanvis : सध्या शिवप्रतिष्ठानचे नेते मनोहर उर्फ संभाजी भिडे हे त्यांच्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. एका महिला पत्रकाराला आधी टिकली लाव नंतर मी तुझ्याशी बोलेन, असे ते म्हणाले होते. आता त्यांच्या वक्तव्याला सगळीकडूनच प्रचंड विरोध केला जात आहे.
बुधवारी संभाजी भिडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी एका महिला पत्रकाराने त्यांना एक प्रश्न विचारला. यावर ते त्या महिला पत्रकाराला म्हणाले की, “तू आधी कुंकू किंवा टिकली लाव, तरच तुझ्याशी बोलेन. प्रत्येक स्त्री ही भारतमातेचं रूप आहे. भारतमाता ही विधवा नाही,” असे वक्तव्य त्यांनी केले होते.
संभाजी भिडे यांच्या या वक्तव्यावर महाराष्ट्र राज्य महिला आयोगही आक्रमक झाला आहे. त्यांनी संभाजी भिडे यांना एक नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये लिहिले की, एका महिला पत्रकाराने कपाळावर टिकली लावली नाही म्हणून आपण तिच्या प्रश्नावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. स्त्रीचा दर्जा हा तिच्या कर्तृत्वाने सिद्ध होत असतो, आपले वक्तव्य स्त्री सन्मानाला आणि सामाजिक दर्जाला ठेच पोहोचविणारे आहे.
आपल्या वक्तव्याबाबत सामाजिक स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने त्याची दाखल घेतली आहे. तरी कपाळावर टिकली लावली नाही म्हणून महिला पत्रकाराशी बोलण्यास नकार देण्यामागील आपल्या भूमिकेचा खुलासा महाराष्ट्र राज्य महिला आयोग कायदा, १९९३ कलम १२(२) व १२(३) नुसार तात्काळ सादर करावा, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे.
तसेच भिडेंच्या या वक्तव्याला सर्वच स्तरातून विरोध दर्शवण्यात येत आहे. त्यांच्यावर मोठया प्रमाणात टीकाही करण्यात येत आहे. यातच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीदेखील यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, मला गुरुजींचा खूप आदर आहे. ते एक हिंदुत्वाचे स्तंभ आहेत. पण मला वाटतं की याप्रकारे कोणत्याही महिलेने कसं जगावं हे कोणीच सांगू शकत नाही. तिची एक जीवनशैली असते आणि त्याप्रकारे ती जगते. त्याचा आदर करावा, असेही त्या म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
supriya sule : ‘मुकाट्याने ऐक नाहीतर आमच्या हातात दंडा’; संभाजी भिडेंच्या कुंकवाच्या वक्तव्याचा वाद चिघळला
sambhaji bhide : “आधी कुंकू लाव, मगच तुझ्याशी बोलतो”, संभाजी भिडेंनी महिला पत्रकाराला झाप झाप झापलं
Tabbu : नागार्जूनच्या प्रेमात वेडी झालेली तब्बू त्याच्यासाठी आयुष्यभर बिना लग्नाची राहीलीय
ncp : पवार रुग्णालयात ॲडमीट असतानाच राष्ट्रवादीत खळबळ; दोन जवळच्या व्यक्तींनी सोडली साथ