“भारताच्या मागील शंभर वर्षांत बघितलं नाही असं बजेट”

मुंबई | माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच चर्चेत असतात. यावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी २०२१-२२ साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. यावर विरोधकांनी जोरदार टीका केली. परंतु अमृता फडणवीस यांनी या अर्थसंकल्पाचं स्वागत करत एक ट्विट केलं. यावरुन पुन्हा त्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत.

‘भारताच्या मागील १०० वर्षात असा अर्थसंकल्प सादर झालेला नाही. हे अर्थसंकल्प सादर करणाऱ्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार. वाढीव कर लावल्याशिवाय देशाच्या प्रगतीस चालना कशी दिली जाऊ शकते हे आता जगातील सर्व देश बघतील आणि शिकतील’. अशा आशयाच ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं आहे.

दरम्यान, या अर्थसंल्पावर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. पण अमृता फडणवीस यांनी ‘’भारताच्या मागच्या शंभर वर्षात कधी झाला नाही असा अर्थसंल्प’’ अशा शब्दात केलेल्या कौतुकावर भल्याभल्यांना भूतकाळात चाचपण्याची वेळ आली.

अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया अनेक क्षेत्रातील लोकांनी दिल्या आहेत. परंतु भारावून गेलेल्या अमृता फडणवीस यांनी शंभर वर्षात असा अर्थसंकल्प बघितला नाही असं म्हटलं आहे. मात्र देशाला स्वतंत्र्य मिळून ७३ वर्षे झाली आहेत. तसेच १९४७ रोजी देशात पहिला अर्थसंकल्प मांडण्यात आला होता. त्यामुळे स्वातंत्र्यापुर्वीही अर्थसंकल्प सादर केला जात होता का असा सवाल उपस्थित होत आहे.

महत्वाच्या बातम्या-
अर्थसंकल्पावर राहुल गांधींनी केली जोरदार टीका, ‘देशाची संपत्ती गरिबांच्या हातात नसून…’
पुन्हा महागाईचा भडका! पेट्रोल-डिझेलवर अधिभार लावण्याचा निर्णय
सत्तेवर आल्यापासूनची मोदी सरकारची सर्वात खराब कामगिरी; ७२ टक्के जनता म्हणतेय…
मुंबई महापालिका आर्थिक दिवाळखोरीत? पालिकेवर दैनंदिन खर्चासाठी कर्ज काढण्याची वेळ 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.