भाजपमध्येही अमृता फडणवीस कलाकार आहेत, यांच्याबाबत दरेकर असेच बोलणार का?

पुणे । काही दिवसांपूर्वी भाजप नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली होती. त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून राजकीय वातावरण देखील तापले होते. यामुळे त्यांच्यावर आता जोरदार टीका केली जात आहे. आता अभिनेत्री आणि राष्ट्रवादीच्या नेत्या प्रिया बेर्डे यांनी दरेकरांवर जोरदार टीका केली आहे.

प्रिया बेर्डे म्हणल्या, पक्षाचे नाव घेऊन ते जर रंगलेल्या गालांचे मुके घेणारे राष्ट्रवादी हा पक्ष आहे. तर मग आणखी काय समजायचे? भाजपमध्येही हेमा मालिनी, स्मृती इराणी, तसेच अमृता फडणवीस या देखील दिग्गज कलाकार आहेत. मग तुम्ही सर्वच महिलांच्या बाबत असे बोलणार आहात का?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

तसेच कोरोनाच्या काळात आमच्या तोंडाचे रंग बघून, टीव्ही बघूनच तुम्ही मनोरंजन करत होतात आणि तुम्ही आता जर याबद्दल बोलत असला तर याचा निषेध करावा वाटतो. स्त्रिया या अंगभर कपडे घालतात, ते तुम्हाला वावडे वाटते, ही मानसिकता कधी बदलेल मला माहिती नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

तसेच दरेकरांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी देखील जोरदार टीका केली होती. माफी मागितली नाही तर गाल लाल करण्यात येईल असा आक्रमक इशारा त्यांनी दिला होता. शिरुरमध्ये प्रवीण दरेकर यांची जाहीर सभा पार पडली होती. तेव्हा त्यांनी हे वक्तव्य केले होते.

तसेच चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस हे उत्तम वक्ते आहेत. त्यांनी आपल्या नेत्यांना तारतम्य बाळगण्यास सांगावे, असा सल्ला मी देणार होते. मात्र त्यांनीच जर अशा नेतांची पाठराखण केल्याने मला फार वाईट वाटत आहे, असेही प्रिया बेर्डे यांनी म्हटले आहे.

प्रवीण दरेकरांच्या या वक्तव्यावर चंद्रकांत पाटील यांनी देखील त्यांची बाजू सावरली होती. यामुळे त्यांच्यावर देखील टीका केली जात आहे. प्रिया बेर्डे यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.