‘तुम्ही कॅशिअर म्हणून कामाला लागल्या, बॅंकेच्या उपाध्यक्ष झाल्या’; कमेंटवर संतापल्या अमृता फडणवीस

मुंबई | राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आक्रमक बोलण्याच्या शैलीने ओळखले जातात. सभागृहातही  सत्ताधारी पक्षा समोर रोखठोकपणे भूमिका मांडत असतात. फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस याही बेधडकपणे आपले मत मांडत असतात.

सोशल मिडियावर अमृता फडणवीस चांगल्याच सक्रिय असतात. देशात घडणाऱ्या गोष्टींवर अमृता फडणवीस ट्विट करत आपली प्रतिक्रिया व्यक्त करत असतात. अमृता फडणवीस यांना गाणे गाण्याची आवड आहे. आपल्या आवजात गाणे गात  सोशल मिडियावर शेअर करत असतात.

अमृता फडणवीस यांना गाण्यांवरून नेहमी ट्रोल करण्यात येते. अमृता फडणवीस या सुध्दा ट्रोलर्सच्या टीकेला सडेतोड उत्तर देत असतात. पुन्हा एकदा अमृता फडणवीस यांच्यावर एका सोशल मिडिया युजर्सने वादग्रस्त पोस्ट केली आहे. यावरून अमृता फडणवीस चांगल्याच संतापल्या आहेत. त्यांनीही  युजर्सवर निशाणा साधला आहे.

संतोश शिंदे नावाच्या एका व्यक्तीने अमृता फडणवीस यांचा फोटो ट्विटरवर शेअर करत पोस्ट लिहिली होती.  त्याने म्हटले की, “मित्रांनो Axis बँकेत चांगला स्कोप आहे. तुम्ही कॅशिअर म्हणून जॉईन करून मॅनेजर अगदी व्ही पी पण होऊ शकता..अट एकच तुमच्यात कचकचून भरलेलं टॅलेंट असायला हवं”.

या ट्विटनंतर अमृता फडणवीस चांगल्याच संतापल्या आहेत. त्यांनी म्हटलं की, “हा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा उध्टपणा आहे. एका स्वावलंबी स्त्रीला जिने अनेक वर्ष निष्ठेने काम केले आहे”.

“तिची पुरूषाशी तुलना करून बदनाम केलं जात आहे. हे केवळ एक ट्विट नाही तर असे अनेक ट्विट पोस्ट केले  आहेत. मुंबई पोलिस आयुक्त तुम्ही दबावाखाली न येता कारवाई कराल अशी अपेक्षा आहे”. असं अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत.

दरम्यान अमृता फडणवीस  राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीवरही हल्लाबोल करत असतात. राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावरही त्यांनी टीका केली आहे. आता युजर्सच्या पोस्टवर अमृता फडणवीस यांनी मुंबई पोलिसांनाच युजर्सवर कारवाई करण्याची मागणी केल्याने पोलिस यावर काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी! स्टेट बँकेत पाच हजार जागांची बंपर भरती; जाणून घ्या कसा कराल अर्ज
वर्दीला सलाम! धावत्या ट्रेनमध्ये जीव धोक्यात घालत पोलिसाने वाचवला लटकलेल्या प्रवाशाचा जीव; पहा थरारक व्हिडीओ
टाटांचा धमाका! फक्त ७९९ रूपयांच्या हप्त्यावर देणार गाडी; जाणून घ्या पुर्ण स्किम..
स्विफ्ट, डिझायर, वॅगनआर मिळवा फक्त दोन लाखांत; मारूती सुझुकी कंपनीने दिला स्वस्त पर्याय

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.