…म्हणून अमरीश पुरी यांना ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटानंतर बेस्ट खलनायक नाही तर बेस्ट डिझायनरचा पुरस्कार देण्यात आला

बॉलीवूडच्या अविस्मरणीय चित्रपटांमध्ये ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटाचे नाव हमखास येते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खुप जोरदार कमाई केली होती. आजही या चित्रपटाला कोणीही विसरू शकले नाही. लोकं अजूनही खुप आवडीने हा चित्रपट पाहत असतात.

या चित्रपटात श्रीदेवी आणि अनिल कपूर मुख्य भूमिकेत होते. दोघांनी त्यांच्या दमदार अभिनय कौशल्याने हा चित्रपट अजरामर केला आहे. अजून एका व्यक्तीमूळे या चित्रपटाची आठवण काढली जाते. त्या व्यक्तीचे नाव आहे अमरीश पुरी. त्यांनी निभावलेली भुमिका अजरामर आहे.

अमरीश पुरीने चित्रपटामध्ये मोगँबोची भुमिका साकारली होती. त्यांच्या या भूमिकेला लोकांनी खुपच पसंत केले होते. आजही बॉलीवूडच्या प्रसिद्ध खलनायकांमध्ये या भुमिकेचे नाव येते. त्यांचा ‘मोगँबो खुश हुवा’ हा डायलॉग आजही प्रसिद्ध आहे.

बॉलीवूडचे महाखलनायक म्हणून अमरीश पुरी यांना ओळखले जाते. आज अमरीश पुरी आपल्यात नाहीत. पण ते त्यांनी निभावलेल्या पात्रांमधून नेहमी जिवंत असतील. त्यांनी १९८० ते २००० या कालावधीत ४०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

त्यांनी निभावलेले सर्व पात्र त्यांनी जिवंत केले आहेत. पण त्यातील काही पात्र मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झाले आहेत. जसे की, मोगँबो, शेरा, दुष्यंत ठाकूर असे कितीतरी किरदार आहेत.

पण ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटातील मोगँबो हे पात्र खुप प्रसिद्ध झाले होते. या पात्राचा पेहरावही तेवढाच प्रसिद्ध झाला होता. पण खुप कमी लोकांना हा पोशाख कोणी तयार हे माहीती असेल.

मिस्टर इंडिया चित्रपटातील मोगँबो या पात्राचा पेहराव स्वतः अमरीश पुरी यांनी डिझाईन केला होता. मोगँबोच्या पेहरावासाठी कोणतीही इमेज नव्हती. मात्र अमरीश यांनीच पुढाकार घेऊन टेलर व डिझायनर माधव यांच्या सोबत काही काम केले.

त्यांनी बॉलीवूडच्या सर्व खलनायकांचा विचार केला. दोन दिवस वेळ घेऊन त्यांनी हा आगळावेगळा पेहराव बनवला आणि तो लोकांना खुप आवडला देखील. दोन तीन वेळेस घालून बघितल्यानंतर त्यांनी हा ड्रेस फायनल केला होता. एवढेच नाही तर मोगँबोच्या हातातील छडी ही देखील अमरीश यांनीच बनवली आहे.

चित्रपट रिलीज झाल्यानंतर फक्त मोगँबोच नाही तर त्याचा ड्रेस देखील लोकांना खुप आवडला होता. या चित्रपटानंतर अमरीश पुरी फक्त अभिनेतेच नाही तर डिझायनर म्हणून देखील खुप प्रसिद्ध झाले होते. त्यांना या ड्रेससाठी पुरस्कार देखील देण्यात आला होता.

महत्वाच्या बातम्या –

रात्रीच्या वेळी साडी घालून बाहेर पडली तारा; लोकं महणाले, लाज वाटू दे…

बॉलीवूड कपल्सच्या लव्ह स्टोरीमध्ये खलनायक बनले होते आई वडील; बघा कोणत्या आहेत ‘त्या’ जोड्या

बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्रींनी त्यांच्या लग्नात घातले होते सर्वात महाग दागिने; किंमत वाचून थक्क व्हाल

‘या’ प्रसिद्ध ठिकाणी हनिमूनसाठी जातात बाॅलीवूड कपल्स; फोटो पाहून थक्क व्हाल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.