मुंबई : राज्यात पुन्हा करोना विषाणूने डोक वर काढलं आहे. अनलॉक फेजमध्ये नागरिकांनी कुठलीही काळजी न घेतल्याने आणि शाळा, हॉटेल, लग्न प्रसंग, समारंभ यातून जास्त लागण नागरिकांना झाल्याचे दिसून येत आहे. कोरोनाची लस आली आहे आता कोणतीही खबरदारी घ्यावी लागणार नाही.
या अविर्भावाने ही रुग्ण वाढले असल्याने प्रशासनानसह आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. विशेषत: मुंबई, पुणे, अमरावती, यवतमाळ, अकोला या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. कोरोनाची परिस्थिती पाहता संबंधित प्रशासनानं कठोर पावलं उचलली आहेत आणि पुन्हा नवे निर्बंध लागू केले आहेत.
२८ फेब्रुवारीपर्यंत राज्यातील अमरावती जिल्ह्यात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यात २८ फेब्रुवारी पर्यंत संचारबंदीचे आदेश दिले गेले असून, या आदेशांअंतर्गत सर्व दुकानं आणि सेवा मात्र पूर्ववत सुरू राहणार आहेत. केवळ गर्दीला प्रतिबंध घालण्यासाठी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
यवतमाळमध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. लग्न समारंभ, सामूहिक किंवा घरगुती कार्यक्रम ५० व्यक्तींच्या मर्यादेत सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत रात्री १० वाजेपर्यंत करण्यास परवानगी देण्यात आली आहे. अंत्यविधीप्रसंगी २० पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येणार नाही. तसेच शहरी आणि ग्रामीण भागामध्ये पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी एकत्र जमू नये.
याचबरोबर सर्व दुकाने, बाजारपेठ रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहतील. रेस्टारंट, हॉटेल सकाळी ८ ते रात्री ९.३० वाजता पर्यंत सुरू ठेवण्यात मुभा देण्यात येत आहे. तसंच होम डिलिव्हरी करण्यासाठी रात्री ११.३० वाजेपर्यंत मुभा राहील. जिल्ह्यातील इयत्ता ५ ते ९ पर्यंत सुरू असलेल्या फक्त नगर परिषद आणि नगर पंचायत क्षेत्रातील शाळा, महाविद्यालये, सर्व प्रकारची खाजगी शैक्षणिक संस्था, खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस दिनांक २८ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपर्यंत बंद राहतील.
करोनाच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत देखील कडक नियम लागू करण्यात आले आहे. जिल्ह्यात हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, बार शनिवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ८ पर्यंत बंद राहतील. यासोबतच चित्रपटगृहं, वाचनालय, ग्रंथालय, ब्युटीपार्लरदेखील उपरोक्त काळात बंद राहिल. पर्यटने स्थळंही बंद राहतील.
महत्त्वाच्या बातम्या
औरंगाबादेत करोना लस घेतलेले दोन डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह; आरोग्य यंत्रणेची उडाली झोप
सरकारने रायगडावर केलेल्या ’त्या’ गोष्टीवरून संभाजीराजे भडकले; म्हणाले हा तर काळा दिवस..
आरोपी महिलेने न्यायाधीशासोबतच बांधली लगीनगाठ, पाच दिवसांनी पुन्हा जावं लागणार तुरूंगात