Share

मैत्रीचा भयानक शेवट! मित्राला वाचवायला गेला पण दोघेही…; काळजाचं पाणी करणारी घटना..

अमरावती जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाळकी धरणात दोन मित्रांचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. पोहायला गेलेला तरुण बुडत असल्यामुळे त्याच्या मित्राने धरणाच्या पाण्यात उडी घेतली आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण दोन्ही तरुणांचा बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.(Amravati two friends dead in dam)

मिळालेल्या माहितीनुसार, नांदगाव पेठ(Nandgao Peth) येथील वाळकी धरणात काही तरुण फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी अभिषेक कुरळकर हा तरुण धरणाच्या पाण्यात पाहण्यासाठी उतरला. पण पाण्याचा अंदाज न आल्यामुळे अभिषेक बुडू लागला. त्यावेळी विनय चव्हाण याने मित्राला वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली. पण अखेर या तरुणांचा बुडून दुर्देवी मृत्यू झाला आहे.

या घटनेची माहिती मिळताच तातडीने पोलीस वाळकी धरणाजवळ दाखल झाले होते. पोलिसांनी मृतदेह काढण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन टीमची मदत घेतली. सायंकाळी ६ वाजता आपत्ती व्यवस्थापन टीमला हे मृतदेह धरणाच्या पाण्याबाहेर काढण्यात यश आले. यानंतर पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले आहेत.

नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेला अभिषेक प्रदीप कुरळकर हा केवळ २० वर्षांचा होता. तर विनय शिवदास चव्हाण हा तरुण २१ वर्षांचा होता. दोन मित्रांचा बुडून मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण अमरावती जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे चव्हाण आणि कुरळकर कुटुंबाला देखील मोठा धक्का बसला आहे.

यापूर्वी देखील नांदगाव पेठ येथील वाळकी धरणात अशा घटना घडल्या आहेत. आतापर्यंत चार तरुणांचा वाळकी धरणात मृत्यू बुडून झाला आहे. या ठिकाणी सुरक्षेच्या कोणत्याही व्यवस्था नाहीत. या परिसरातील नागरिकांनी अनेकवेळा प्रशासनाकडे पर्यटकांच्या सुरक्षेच्या संदर्भात तक्रारी केल्या आहेत. पण अद्याप प्रशासनाकडून याबाबत कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही.

काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना इगतपुरीमध्ये घडली होती. मेंढ्या चरण्यासाठी गेलेल्या मायलेकींचा विहिरीत बुडून मृत्यू झाला होता. मायलेकी मेंढ्या चरण्यासाठी शेतामध्ये गेल्या होत्या. त्यावेळी पाणी पिण्यासाठी गेलेली मुलगी विहिरीत पाय घसरून पडली. मुलीला बुडत असल्याचे पाहून आईने विहिरीत उडी घेतली. यामध्ये मायलेकींचा बुडून मृत्यू झाला होता.

महत्वाच्या बातम्या :-
शिवसेना भाजप एकत्र येण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी स्वत:च दिले होते संकेत; तेव्हा शिंदे म्हणाले होते ठाकरेंचा आदेश…
स्वार्थासाठी इकडून तिकडे उड्या मारणे माझ्या रक्तात नाही, माझी निष्ठा केवळ शिवसेनेशी – एकनाथ शिंदे
महाविकास आघाडीला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, आमदारांना १२ जूलैपर्यंत अपात्र ठरवता येणार नाही

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now