चक्क शिवसेना आणि एमआयएम यांची युती, उंदीर-मांजराच्या मैत्रीची राजकीय वर्तुळात चर्चा

अमरावती | अलीकडच्या काळात सत्तेसाठी राजकीय समीकरणे कशी बदलतील हे सांगता येत नाही. अशाच एका युतीच्या चर्चेने राजकीय वर्तुळात जोर धरला आहे. अमरावती येथील महानगरपालिका स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत चक्क कट्टर हिंदुत्वावादी पक्ष अशी ओळख असेलेल्या शिवसेनेनं एमआयएमला पाठिंबा दिला आहे.

दरम्यान औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराला पराभूत करत एमआयएमने शिवसेनेला जोरदार झटका दिला होता. परंतु अमरावती महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाला धक्का देण्यासाठी शिवसेना, AIMIM, काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी चांगलीच तयारी केली होती.

कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणाऱ्या शिवसेना आणि एमआयएमने एकत्र येऊन भाजपविरोधात आखलेली रणनीती चर्चेचा विषय ठरली आहे. परंतु नाट्यमय घडामोडीनंतर भाजपाचाच उमेदवार स्थायी समितीच्या अध्यक्षपदावर निवडून आला आहे.

भाजपाचा उमेदवार निवडून आल्याने विरोधकांचा मोठा डाव फसला आहे. या निवडणुकीत भाजपाच्या शिरीष रासने यांना ९ मते मिळाली. तर एमआयएमचे अफजल हुसेन मुबारक हुसेन यांना ६ मते मिळाली.

एमआयएमच्या उमेदवारास शिवसेनेने मतदान केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. यामुळे अनेक राजकीय चर्चांना उधाण आल्याचे दिसून आले. याबाबत शिवसेनेच्या नेतेमंडळींना विचारले असता त्यांनी स्थानिक पातळीवरील युती म्हणून यावर भाष्य करण्याचे टाळले आहे.

महत्वाच्या बातम्या-
बाळासाहेब ठाकरेंच्या ४०० कोटींच्या स्मारकाऐवजी रूग्णालय उभारा – इम्तियाज जलील
कोरोनाचे नियम धाब्यावर! मनसे नेत्याने डान्सबारचा व्हिडीओ आणला समोर
‘नियम मोडला तर उद्धव ठाकरे आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडत नाहीत’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.