अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवरुन अमित शाहांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामीला मुंबई पोलिसांना अटक केली आहे. अर्णब गोस्वामीच्या अटकेवरून राजकीय वर्तुळात चर्चा आहे. वेगवेगळे विरोधी पक्षनेते महाआघाडीवर सरकारवर निशाणा साधत आहेत. आता अमित शाहा यांनीदेखील यावर आपले मत मांडून ठाकरे सरकारवर आणि कॉंग्रेसवर हल्ला चढविला आहे.

अमित शाह यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुन्हा एकदा लोकशाहीला लाज आणली आहे. राज्याकडून रिपब्लिक आणि अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात होणारा सत्तेचा गैरवापर हा लोकशाहीचा चौथा खांब आणि एका व्यक्तीच्या स्वातंत्र्यावरील हल्ला आहे. यामुळे पुन्हा एकदा आणीबाणीची आठवण झाली आहे. प्रेसवर झालेल्या या हल्ल्याचा निषेध केलाच पाहिजे.”

अमित शाह यांनी इंदिरा गांधींच्या आपत्कालीन घटनेशी ही घटना जोडली असून अप्रत्यक्षरित्या कॉंग्रेसवर टिका केली आहे. तसेच अर्णव पोलिसांनी अटक केल्यानंतर राजकीय वर्तुळातून आता याचे थेट पडसाद उमटताना दिसत आहेत. अमित शाह यांनीदेखील अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवरुन ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

फक्त राजकीय वर्तुळातच नव्हे, तर सोशल मीडियावर विविध क्षेत्रांतील व्यक्तींनी सदर प्रकरणात आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यातच अमित शहा यांनीदेखील हे ट्विट केले आहे.

सुर्यकुमार यादवला भारतीय संघात स्थान का नाही? रवी शास्त्री म्हणाले…

एकेकाळी भारताची शान असणाऱ्या मायक्रोमॅक्सने पुन्हा घेतली दमदार एन्ट्री; दोन स्मार्टफोन लॉन्च

छत्रपती संभाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी अलका कुबल यांनी मागितली माफी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.