धक्कादायक! आयसीयु बेड मिळवून देण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्याने मागितले १ लाख ८० हजार

राज्यभरात कोरोना प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णालयांवर ताण येताना दिसून येत आहे. त्यामुळे रुग्णालयात ऑक्सिजन, बेड्स आणि औषधांचा तुडवडा निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत अनेक धक्कादायक घटना घडत आहे.

अनेक रुग्णालयात बेडसाठी लूटमार सुरु असल्याच्या घटना सुरु आहे. आता अशीच एक घटना नाशिकमध्ये घडली आहे. एका आरोग्य कर्मचाऱ्याने आयसीयु बेड मिळवून देण्यासाठी तब्बल १ लाख ८० हजार रुपयांची मागणी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

नाशिकच्या जुन्नर तालूक्यातील ही घटना घडली असून याप्रकरणी आळेफाटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपीने या गुन्ह्याबाबत कबुलीही दिली आहे.

नाशिकच्या सिन्नर येथे एका कुटुंबातील २ भाऊ आणि आईला कोरोनाची लागण झाली होती. प्रकृती बिघडत असल्यामुळे त्यांना आयसीयु बेडची गरज होती. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी आळेफाटा परिसरात बेड शोधण्यास सुरुवात केली.

तेव्हा जुन्नर तालुक्यातील आळे प्राथामिक केंद्रात अमोल पवार नावाचा एक फार्मासीस उपस्थित होता. नातेवाईकांनी चौकशी केली असता, १ लाख ८० रुपये द्या बेड मिळवून देतो, असे नातेवाईकांना सांगितले.

रुग्णांना बेडची गरज होती, त्यामुळे त्यांनी तातडीने अमोलच्या बँक अकाऊंटमध्ये पैसे जमा केले. त्यानंतर त्या रुग्णांना पिंपरी-चिंचवडच्या सरकारी न्यु भोसरी रुग्णालयात आयसीयु बेड उपलब्ध करुन दिले. मात्र उपचारादरम्यान तिन्ही रुग्णांचा मृत्यु झाला.

त्यानंतर रुग्णांच्या नातेवाईकांनी आळे येथील आरोग्य कर्मचारी अमोल पवार गुन्हा दाखल केला. आता हा गुन्हा आरोपीने कबुल केला आहे. आरोग्य कर्मचाऱ्या बेड मिळवून देण्याच्या पद्धतीमुळे कोणती साखळी कार्यरत आहे का?, असा प्रश्न पोलिसांना पडला असून त्यांनी याबाबत तपास सुरु केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

लसीचे दोन डोस घेऊनही पद्मश्री विजेत्या डाॅक्टरचे कोरोनामुळे निधन; रूग्णांवर मोफत करायचे उपचार
कुली चित्रपटातील हा चिमुकला आठवतो का? आता हा बिझनेस करून कमावतोय करोडो रूपये
‘सोनू के टिटू की स्वीटी’ फेम अभिनेत्री आहे करोडोंच्या संपत्तीची मालकिण; पहा तिच्या मुंबईतील आलिशान घराचे फोटो

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.